मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम आणि तिच्या बहिणीला एका विचित्र अनुभवाला सामोरं जावं लागलंय. हा अनुभव खुद्द यामीनंच सोशल मीडियावरून आपल्या फॅन्सपर्यंत पोहचवलाय. यामी गौतमची बहिण सुरीली हिला एका रेस्टॉरन्टमधून बाहेर काढण्यात आलं. या घटनेचा एक व्हिडिओ यामीनं आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केलाय. 


सुरीली

COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यामी सध्या बहिण सुरीलीसोबत शुटिंगसाठी सर्बियामध्ये आहे. दोघी बहिणी एका रेस्टोरन्टमध्ये गेल्या असता सुरीलीनं पॅन्ट परिधान न केल्यानं तिला रेस्टोरन्टच्या स्टाफनं बाहेर जाण्यास सांगितलं. मिळालेल्या माहितीनुसार, हे रेस्टोरन्ट सर्बियामधलं प्रसिद्ध रेस्टोरन्ट आहे. सर्बियामधला हा अनुभव आपल्यासाठी वाईट असल्याचं यामीनं म्हटलंय. 



सुरीली लवकर 'बॅटल ऑफ सारागढी' या सिनेमातून बॉलिवूड डेब्यू करत आहेत. या सिनेमाचा दिग्दर्शन राजकुमार संतोषी करत आहेत. तर यामी सध्या शाहिद कपूरसोबत 'बत्ती गुल मीटर चालू' या सिनेमासाठी मेहनत घेतेय. याशिवाय ती उरी दहशतवादी हल्ल्यावर आधारित सिनेमा 'उरी' या सिनेमातदेखील दिसणार आहे.