Pamela Chopra Death : बॉलिवूडचे लोकप्रिय दिवंगत दिग्दर्शक यश चोप्रा (Yash Chopra) यांच्या पत्नी पॅमेला चोप्रा (Pamela Chopra) यांचे निधन झाले आहे. आज 20 एप्रिल रोजी वयाच्या 85 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पॅमेला यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीला मोठा धक्काबसला आहे. पॅमेला या एक उत्तम गायिका होत्या. त्यांनी यश चोप्रा यांच्या अनेक चित्रपटांना म्युझिक दिलं होतं. इतकंच काय तर त्या एक फिल्म राईटर आणि निर्मात्या देखील होत्या. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्रेड अॅनलिस्ट कोमल नाहटा यांनी आजतकला पॅमेला यांच्या निधनाच्या दिलेल्या माहितीनुसार त्यांनी आज सकाळी अखेरचा शेवट केला आहे. पॅमेला यांनी 1970 साली पारंपारिक पद्धतीनं यश चोप्रा यांच्याशी लग्न केलं होतं. यश चोप्रा यांना कोणत्या चित्रपटाच्या पटकथेवर काही चर्चा करायची असेल तर ते पॅमेला यांचीशी बोलायचे त्यांचे काय मत आहे हे त्यांना जाणून घ्यायचं असायचं. तर पती यश चोप्रा यांच्या निधनाच्या जवळपास 11 वर्षांनंतर पॅमेला यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. पॅमेला यांना दोन मुलं असून आदित्य चोप्रा (Aditya Chopra) आणि उदय चोप्रा (Udya Chopra) असं त्याचे नाव आहे. तर अभिनेत्री राणी मुखर्जी त्यांची सून आहे. पॅमेला यांच्या निधनानं संपूर्ण कुटुंबाला खूप मोठा धक्का बसला आहे. तर बॉलिवूडमध्ये शोककळा पसली आहे. 


हेही वाचा : स्वत: ला Bollywood म्हणणं बंद करा; Mani Ratnam यांनी बॉलिवूडकरांना सल्ला दिला की झापलं?


पॅमेला यांनी फक्त त्यांचे पती यश चोप्रा यांच्या चित्रपटांमध्येच गाणी गायली होती. 1993 साली प्रदर्शित झालेल्या आईना या चित्रपटाची निर्माती पॅमेला चोप्रा यांनी केली होती. पॅमेला यांनी पती यश चोप्रा, मुलगा आदित्य चोप्रा आणि प्रोफशन्ल लेखकर तनुजा चंद्रा यांच्यासोबत 1997 साली प्रदर्शित झालेल्या दिल तो पागल हे या चित्रपटासाठी पटकथा लिहिली होती. याशिवाय 'दिल तो पागल है' या चित्रपटातील 'एक दुजे के वास्ते' या पहिल्या गाण्यासाठी त्या मोठ्या पडद्यावर दिसल्या होत्या. तर या गाण्यात पॅमेला यांनी यश चोप्रा यांच्यासोबत पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती. 



दरम्यान, पॅमेला यांच्या कामाविषयी बोलायते झाले तर त्या सगळ्यात शेवटी यशराजच्या माहिती पटात (Documentry) दिसल्या होत्या. या माहिती पटाचे नाव द रोमॅन्टिक्स असे होते. या माहिती पटात पॅमेला यांनी त्याचे पती यश राज यांची जर्नी आणि YRF ची लेगेसीविषयी अनेक गोष्टी सांगितल्या होत्या.