स्वत: ला Bollywood म्हणणं बंद करा; Mani Ratnam यांनी बॉलिवूडकरांना सल्ला दिला की झापलं?

Mani Ratnam On Bollywood Films : मणिरत्नम यांनी सीआईआई दक्षिण मीडिया अॅन्ड एन्टर्टेंनमध्ये समिटच्या पॅनल डिस्कशनवेळी बॉलिवूड चित्रपटसृष्टीनं स्वत: ला बॉलिवूड म्हणणं बंद करायला हवं असं म्हटलं तर त्यासोबतच त्यांनी संपूर्ण भारतीय चित्रपटसृष्टीला भारतीय सिनेमा म्हणून ओळखायला पाहिजे हे देखील सांगितले. 

दिक्षा पाटील | Updated: Apr 20, 2023, 11:05 AM IST
स्वत: ला Bollywood म्हणणं बंद करा; Mani Ratnam यांनी बॉलिवूडकरांना सल्ला दिला की झापलं? title=
(Photo Credit : Madras Talkies Instagram)

Mani Ratnam On Bollywood Films : दिग्दर्शक मणिरत्नम (Mani Ratnam) हे त्यांच्या पोन्नियिन सेल्वन (Ponniyin Selvan) या चित्रपटामुळे सध्या चर्चेत आहेत. पोन्नियिन सेल्वनचा दुसरा भाग हा 28 एप्रिल रोजी प्रदर्शित होणार आहे. तर मणिरत्नम यांनी एका पॅनल डिस्कशनमध्ये हिंदी चित्रपटांवर वक्तव्य केलं आहे. चेन्नईमध्ये सुरु असलेल्या सीआईआई दक्षिण मीडिया अॅन्ड एन्टर्टेंनमध्ये समिटच्या पॅनल डिस्कशनवेळी त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. हिंदी चित्रपटसृष्टीनं स्वत: ला बॉलिवूड म्हणनं थांबवायला हवं असं म्हटलं आहे. (CII Dakshin Media and Entertainment Summit in Chennai)

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा संपूर्ण जगावर कसा परिणाम होतो? 

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीचा संपूर्ण जगावर कसा परिणाम होतो त्यावर सुरु असलेल्या डिस्कशन पॅनलमध्ये मणिरत्न्म यांनी वक्तव्य केलं आहे. हे पॅनल डिस्कशनं काही दिवसांपूर्वी दाक्षिणात्य चित्रपटांनी ग्लोबल मार्केटमध्ये कसं काम केलं यावरून सुरु होतं. तर त्यात (RRR) आरआरआर, पुष्पा :  द राईज, कांतारा आणि केजीएफ : चॅप्टर 2 या चित्रपटांना मिळालेलं यश आहे. यावेळी पॅनल डिस्कशनमध्ये चित्रपट निर्माता वेत्रीमारन आणि बेसिल जोसेफ (Basil Joseph) आणि अभिनेता-दिग्दर्शक ऋषभ शेट्टी हे उपस्थित होते. (South Indian Movies)

या पॅनल डिस्कशनमध्ये मणिरत्नम म्हणाले, पाश्चिमात्य देशांमध्ये भारतीय चित्रपटांना बॉलिवूड म्हणून ओळखल्या जाण्यावर वक्तव्य केलं होतं. ते म्हणाले, जर हिंदी चित्रपट सृष्टीनं स्वत: ला बॉलिवूड म्हणणं बंद केलं तर लोक भारतीय चित्रपटांना बॉलिवूड म्हणून ओळखण बंद होईल. दरम्यान, त्यांनी केलेल्या या वक्तव्यानंतर चाहत्यांना प्रश्न पडला होता की नक्की त्यांनी बॉलिवूडला सल्ला दिला आहे की झापलं आहे? मणिरत्नम यांच्या या वक्तव्यावर वेत्रीमारन यांनी यावर त्यांनाही असं वाटतं असं सांगितलं. 

हेही वाचा : Moonbin Death : अवघ्या 25 व्या वर्षी कोरियन पॉप स्टार मूनबिनचं निधन; घरात आढळला मृतदेह

वेत्रीमारन (Vetrimaaran) यावर म्हणाले, मी वूडचा चाहता नाही. जसं की बॉलिवूड, कॉलीवूड इत्यादी... आम्हाला या सगळ्यांना भारतीय चित्रपट म्हणून पाहायचं आहे. पुढे कसे चित्रपट बनवायला हवं यावर ते म्हणाले, लोकांना आपली वाटेल अशा गोष्टींवर चित्रपट बनवायला हवेत. असेच चित्रपट पाहायला प्रेक्षकांना आवडतात. वेत्रीमारन यांनी केलेल्या या वक्तव्यावर ऋषभ शेट्टी (Rishab Shetty) म्हणाला, पटकथा जितकी सामान्य माणसाला आपलीशी वाटेल तितका तो चित्रपट जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. 

कार्यक्रमाविषयी बोलायचे झाले तर, हा कार्यक्रम दोन दिवसांचा होता. या कार्यक्रमात अनेक अभिनेते, दिग्दर्शक, निर्माते,  OTT प्लॅटफॉर्मचे नॅशनल हेड्स उपस्थित होते. या पॅनल डिस्कशनमध्ये भारतातील 60 पेक्षा जास्त कलाकारांनी हजेरी लावली होती.