मुंबई : यश जोहर यांच्या चित्रपटांमध्ये भव्य सेट्स आणि परदेशी लोकेशन्स कायमच पहायला मिळतात. त्याचबरोबर अनेक मोठ्या आणि गाजलेल्या चित्रपटांची निर्मिती केल्याबद्दल त्यांचं नाव भारतातच नाही कप परदेशात देखील प्रसिद्ध आहे. यश जोहर यांनी चित्रपटात आपलं करिअर करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी हा बिझनेस चांगल्या दृष्टींनं पाहिलं जात नव्हतं.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यश जोहर यांचा जन्म १९२९ मध्ये लाहोरमध्ये झाला होता. फाळणीनंतर त्याचं कुटुंब दिल्लीत शिफ्ट झालं. यश जोहरच्या वडिलांनी 'नानकिंग स्वीट्स' नावाच्या मिठाईचे दुकान उघडलं. आपल्या ९ भावंडांमध्ये सर्वात शिक्षित असल्याने, त्यांना दुकानात बसावं लागायचं मात्र यश यांना दुकानात बसणं अजिबात आवडत नव्हतं. यश जोहरच्या आईला हे कळताच ती म्हणाली, ''तू मुंबईला जा, मिठाईच्या दुकानात बसण्यासाठी तुझा जन्म नाही झालाय.''



यश जोहर मुंबईला जाण्यापूर्वी एक आठवडा आधी त्यांच्या आईने घरातून दागिने आणि काही पैसे चोरीला गेले होते.  या सगळ्या घटनेची शंका सिक्योरिटीकडे गेली आणि त्याला मारहाण करण्यात आली, मात्र तरीही यश यांची आई मुलाला मुंबईला पाठविण्यासाठी पैसे जमवण्याचा प्रयत्न करत होती.


मधुबालाच्या फोटोने नशिब बदललं
मुंबईत येऊन त्यांनी एका वृत्तपत्रात छायाचित्रकार होण्यासाठी धडपड सुरू केली. त्या दिवसांत 'मुगल ए आजम'चं शूटिंग चालू होतं. त्याच सेटवर त्यांनी मधुबालाचे फोटो काढले. मधुबालाबद्दल असं सांगितले जात होते की, मधुबाला यांनी त्यांचे फोटो कोणालाही काढू दिले नव्हते, पण यश जोहर शिकलेले होते आणि इंग्रजीही बोलत होते. यामुळे मधुबाला यांनी त्यांना फोटो काढण्याची परवानगी दिली. इतकेच नाही तर मधुबाला यश जोहर यांच्यावर इतक्या इंप्रेस झाल्या की, मधुबाला यांनी यश यांना त्यांच्या बागेत भेटायला बोलावले. यानंतर यश जोहर प्रकाश झोतात आले आणि त्यांना नोकरीची संधी मिळाली.


सक्सेस झालं प्रॉडक्शन हाऊस
यश जोहर सह-निर्माता म्हणून देवानंद यांच्या प्रॉडक्शन हाऊसमध्ये सामील झाले. त्यांनी गाइड, ज्वेलथीफ, प्रेम पुजारी, हरे रामा हरे कृष्णा यासारखे चित्रपट पडद्यावर आणण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिलं. यश जोहर यांनी 1977 साली धर्मा प्रॉडक्शन कंपनी सुरू केली