नवी दिल्ली : प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्री आणि कॉरिओग्राफर मोहेना कुमारी सिंह कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती मिळत आहे. मोहेना कुमारी उत्तराखंड सरकारचे कॅबिनेट मंत्री सतपाल महाराज यांनी सून आहे. सतपाल महाराजांनाही कोरोनाची लागण झाली आहे. एवढंच नाही तर त्यांची पत्नी आणि इतर स्टाफमध्येही कोरोनाची लक्षणं आढळली आहेत. या सर्वांना क्वारंटाईन करण्यात आलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहेना कुमारी सध्या क्वारंटाईनमध्ये आहे. जिल्हा प्रशासनाने त्यांच्या कोठीवाले या भागालाही कन्टेंन्मेंट झोन घोषित केलं आहे. मोहेना कुमारीने प्रसिद्ध टीव्ही शो 'ये रिश्ता क्या केहलाता है'मध्ये प्रमुख भूमिका साकारली होती. मोहेना गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात 2019मध्ये सतपाल महाराज यांचा मुलगा सुयश रावतशी विवाहबंधनात अडकली. 


मध्यप्रदेशमधील रीवा येथील शाही घराण्यात जन्मलेल्या मोहेना कुमारीने 'डान्स इंडिया डान्स'च्या सीजन 3 पासून करियरची सुरुवात केली होती. त्याशिवाय 'दिल दोस्ती डान्स'मध्येही ती सहभागी होती. 'झलक दिखला जा' या डान्स रिऍलिटी शोमधील काही सीजनमध्ये मोहेनाने डान्स कोरिओग्राफर म्हणून काम केलं आहे.