धक्कादायक : मंदिरा बेदीचा खुलासा म्हणाली, क्रिकेटर माझ्याकडे...
बॉलिवूड अभिनेत्री आणि टीव्ही प्रेझेंटर मंदिरा बेदीने बऱ्याच वर्षांनंतर एका मुलाखतीत अनेक गुपितं उघड केली आहेत.
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री आणि टीव्ही प्रेझेंटर मंदिरा बेदीने बऱ्याच वर्षांनंतर एका मुलाखतीत अनेक गुपितं उघड केली आहेत. अलीकडेच तिने एका मुलाखतीदरम्यान खुलासा केला आणि सांगितलं की, क्रिकेटर तिच्याशी कसे वाईट वागायचे. त्या खेळाडूंना पाहून ती खूप घाबरायची. खेळाडू तिच्याकडे बऱ्याचदा वाईट नजरेने पाहायचे की तिला त्यांची खूपच भिती वाटू लागली होती. मंदिरा म्हणाली की त्यांना माझे प्रश्न खूप बालिश वाटायचे. त्यांचं माझ्याशी वागणं चांगलं नव्हतं.
49 वर्षीय मंदिरा बेदीने 2003, 2007 मध्ये ICC वर्ल्ड कप, 2004 आणि 2006 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि IPL च्या सीझन 2 मध्ये टीव्ही प्रेजेंटर म्हणून काम केलं आहे. अभिनेत्री मंदिरा बेदी ही अशा महिलांपैकी एक आहे. जिने टीव्हीवरील क्रिकेट शो होस्ट केले आहेत आणि प्रस्तुतकर्त्याची भूमिका साकारली आहे. बऱ्याच वर्षांनंतर मंदिरा तिच्या भूमिकेबद्दल बोलली. दिलेल्या एका मुलाखतीदरम्यान मंदिराने सांगितलं की, क्रिकेटपटूंचं माझ्याशी असलेलं वागणं चांगलं नव्हतं. ते तिच्याशी कधीच चांगले वागले नाही.
तिच्याकडे टक लावून पाहायचे आणि तिच्या प्रश्नांची नीट उत्तरंही देत नव्हते. ती म्हणाली की, मी तिथे क्रिकेट शो होस्ट करते हे अनेकांना आवडलं नाही. मी साडी नेसून क्रिकेट शो सादर करतेय हे देखील काही लोकांना आवडलं नाही. मला कोणीही मार्गदर्शन केलं नाही. प्रश्न विचारले नाहीत, असं ती म्हणाली. मला क्रिकेटचे बारकावे माहीत नव्हते. मी तिथे सामान्य लोकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी गेले होते.
मंदिराने मुलाखतीदरम्यान सांगितलं की, अनेकदा असंही घडलं आहे की, ती क्रिकेटर्सना प्रश्न विचारण्यास घाबरत होती. तिचे प्रश्न ऐकून अनेक क्रिकेटपटूंना 'हा काय प्रश्न विचारतोय' असं तिला वाटायचं आणि अनेकदा त्यांनी माझ्या प्रश्नांची उत्तरंही दिली नाहीत. हा अनुभव खूपच भीतीदायक होता.
या सर्व परिस्थितीत चॅनल्स नेहमीच माझ्या पाठीशी उभं राहिलं. वाहिनीने मला प्रोत्साहन दिलं आणि सांगितलं की, आम्ही 200 महिलांमधून तुझी निवड केली आहे. तुमच्या मनात जे काही प्रश्न असतील ते विचारा. वाहिनीने मला प्रोत्साहन दिलं आणि सांगितलं की, तुझ्यात प्रतिभा आहे, म्हणूनच तू इथे आहेस. तुम्ही पुढे जा आणि स्वतःला सिद्ध करा.