`ये जवानी है दिवानी` पुन्हा थिएटरमध्ये: मैत्री आणि प्रेमाचं गोड नात येतयं प्रेक्षकांच्या भेटीला
2024 मध्ये अनेक चित्रपट रि-रिलिज झाले आहेत. ज्यात `तुब्बाड`, `कल हो ना हो`, `रॉकस्टार` आणि `कभी खुशी कभी गम` यांसारख्या चित्रपटांचा समावेश आहे. त्यातच आता आणखी एक सुपरहिट चित्रपट `ये जवानी है दिवानी` पुन्हा थिएटरमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Yeh Jawaani Hai Deewani Re-Release: दीपिका पदुकोण आणि रणबीर कपूर यांच्या अभिनयाने गाजलेल्या या चित्रपटाला 2013मध्ये प्रदर्शित झाल्यापासून प्रेक्षकांचा खूप प्रतिसाद मिळालेला. करण जोहर आणि धर्मा प्रॉडक्शन्स यांनी एका पोस्टद्वारे या चित्रपटाच्या पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याची घोषणा केली आहे. अयान मुखर्जी दिग्दर्शित 'ये जवानी है दिवानी' आता 3 जानेवारी 2024 रोजी पुन्हा मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.
'ये जवानी है दिवानी' पुन्हा प्रदर्शित होणार:
करण जोहरच्या प्रोडक्शन हाऊसने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये चित्रपटाचे एक आकर्षक पोस्टर देखील आहे. पोस्टमध्ये लिहिले आहे, 'गँग परत आली आहे... आम्ही सर्व आनंदी आहोत कारण #YehJawaaniHaiDeewani 3 जानेवारीला पुन्हा प्रदर्शित होणार आहे! तारीख जतन करा!' या घोषणेनंतर चाहते खूप उत्साहित झाले आहेत.
चाहत्यांना थोडे अधिक रोमांच:
प्रत्येकाने आपल्या आठवणींमध्ये ठेवलेल्या नैना आणि बनीच्या प्रेमकहाणीला पुन्हा अनुभवायला मिळणार असल्यामुळे चाहते उत्साही झाले आहेत. एका नेटकऱ्याने लिहिले, 'दीपिका पदुकोणने तिच्या चाहत्यांसाठी एक मोठी भेट दिली आहे... त्यांना पुन्हा रोमान्स करताना पाहणे खूप आनंददायी असेल.' दुसऱ्या नोटकऱ्याने लिहिले, 'तुम पहले भी इतनी खूबसूरत थी या वक्त ने किया कोई हसीं सितम?' तर एका चाहत्याने लिहिले, 'कोणी जावो वा न जावो... मी नक्कीच जाणार! हा माझा आवडता चित्रपट आहे.'
हे ही वाचा: https://zeenews.india.com/marathi/entertainment/tare-zameen-par-ishaan-awasthi-meets-mother-maya-awasthi-again-after-17-years-fans-also-reminisced-after-watching-the-video/873657
'ये जवानी है दिवानी' किती शहरांमध्ये प्रदर्शित होणार?
ये जवानी है दिवानी 3 जानेवारी 2024 रोजी 46 शहरांमधील 140 PVR INOX थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. याआधी करण जोहरचे 'कल हो ना हो' आणि 'वीर झारा' यासारखे चित्रपट देखील या वर्षी पुन्हा प्रदर्शित झाले होते.
चित्रपटाची कथा आणि गाणी:
'ये जवानी है दिवानी' हा चित्रपट चार तरुण मित्रांची कथा आहे जी त्यांच्या जीवनात नवीन सुरुवात करण्याचा निर्णय घेतात. यातील गाणी 'बदतमीज दिल', 'दिल्लीवाली गर्लफ्रेंड' आणि 'बलम पिचकारी' यासारखी हिट गाणी अजूनही प्रेक्षकांच्या मनात गाजत आहेत.
जर तुम्हाला एक वेगळा अनुभव हवा असेल आणि तुमच्या आवडत्या चित्रपटाला पुन्हा थिएटरमध्ये अनुभवायचं असेल. तर 3 जानेवारीला 'ये जवानी है दिवानी'चे रि-रिलिज पाहायला विसरू नका.