नवी दिल्ली :बॉलीवुड स्टार अक्षय कुमारला उत्तर प्रदेशच्या योगी सरकारने उघड्यावर शौच करण्याच्या सवयीपासून परावृत्त करण्यासाठी समाजात सजगता निर्माण करण्याचा मोहिमेचा एक भाग बनवला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

संबंधित सरकारी योजनांमध्ये अभिनेता अक्षय कुमारची निवड ब्रॅन्ड अ‍ॅम्बॅसेडर म्हणून करण्यात आली आहे.


 



उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यासंबंधित अधिकृत घोषणा केली आहे.  लखनऊमध्ये आयोजित  एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासोबत अक्षय कुमारने सहभाग घेत झाडूने काही भाग स्वच्छ केला. सोबतच भूमी पेडणेकरनेदेखील कचरा काढला.


 


'टॉयलेट - एक प्रेमकथा' या आगामी हिंदी चित्रपटात अक्षय आणि भूमी ही जोडी झळकणार आहे. हा  चित्रपटदेखील स्वच्छता आणि उघड्यावर शौच करण्याच्या विरोधात भाष्य करणारी रंजक स्टोरी आहे.


 



लखनऊमधील कार्यक्रमात सहभागी झाल्यानंतर अक्षयने त्याच्या फॅन्ससाठी ट्विटरवर एक खास गाणंदेखील शेअर केलं .