विकी कौशलला कतरिनामध्ये जे गुण दिसले, त्याचा विचारही तुम्ही केला नसेल
विकी कौशलला पत्नीमध्ये हवे आहेत हे गुण, कतरिना कैफकडे थेट इशारा?
मंबई : अभिनेता विकी कौशल (Vicky Kaushal), बेयर ग्रिल्स (Bear Grylls) च्या शो 'Into the Wild with Bear Grylls' च्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीस येणार आहे. नुकताचं शोचा प्रोमो प्रदर्शित झाला आहे. ज्यामध्ये तो समुद्रात भयानक स्टंट करताना दिसत आहे. शोमध्ये विकीने त्याच्या खासगी आणि प्रोफेशनल लाईफबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला. एवढंच नाही यावेळी विकीने होणाऱ्या पत्नीत कोणते गुण असायला हवे याबद्दल उघडपणे सांगितलं आहे.
पत्नीमध्ये असायला हवे असे गुण
बेयर गिल्स (Bear Grylls) शोमध्ये विकीने त्याच्या लग्नाच्या प्लानबद्दल सांगितलं आहे. होणाऱ्या पत्नीमध्ये कोणते गुण असायला हवेत? असा प्रश्न विचारला असता विकी म्हणाला, 'आमच्या दोघांमध्ये एकमेकांना समजून घेण्याची क्षमता हवी... दोघांना एकमेकांचे चांगले आणि वाईट गुण योग्य प्रकारे हाताळता यायला हवे.. हे गुण मला माझ्या होणाऱ्या पत्नीमध्ये असायला हवेत...'
विकीच्या बोलण्यावरून स्पष्ट होत आहे की तो अभिनेत्री कतरिना कैफकडे इशारा करत आहे. कारण दोघांमध्ये चांगली बॉन्डिंग आहे. एवढंच नाही तर दोघे लग्न देखील करणार आहे. सध्या सर्वत्र त्यांच्या लग्नाची चर्चा आहे. डिसेंबर महिन्यात ते लग्न करणार असल्याचं कळत आहे. लग्नासाठी दोघांची जोरदार तयारी देखील सुरू आहे.
एका रिपोर्टनुसार, दोघांनी लग्नाची तयारी सुरू केली आहे. दोघांचे वेडिंग आउटफिट्स डिजायनर सब्यसाचीने डिझाइन केले आहेत. यापूर्वी सब्यसाचीने दीपिका पदुकोणच्या लग्नाचा ड्रेसही डिझाइन केला होता. या वर्षी डिसेंबर महिन्याच्या आठवड्यात दोघं लग्न करू शकतात.