मुंबई : लोकेश राहुल आणि मनीष पांडे सारखे खेळाडू आज भरपूर चर्चेत आले. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलच्या ऑक्शनच्यावेळी या खेळाडूंना चांगल्या मानधनावर संघाने विकत घेतलं. राजस्थान रॉयल्स या संघाने बोली प्रक्रियेत किंग्स इलेव्हन पंजाब आणि चैन्नई सुपर किंग्सला मागे टाकत 12 करोड 50 लाखात स्टॉक्स विकत घेतला. खेळाडूंच्या या खरेदीमध्ये आणखी एका नावाची चर्चा होती.



जाणून घेऊया कोणंत हे नाव जास्त चर्चेत होतं. 


केकेआर संघाकडून अभिनेत्री जुही चावला, पती जय मेहता ऑक्शनमध्ये सहभागी झाले. यावेळी जुहीची मुलगी जान्हवी मेहता आकर्षणाचा विषय ठरली. जान्हवी ऑक्शनच्या टेबलवर पूर्णवेळ आपल्याला पाहायला मिळाली. 



आयपीएल 2018 च्या ऑक्शन टेबलवर 17 वर्षाची जान्हवी कोलकाता नाइट रायडर्सच्या मॅनेजमेंट टीममध्ये प्रमुख सद्स्य म्हणून पाहायला मिळाली. 



कायम लाइम लाइटपासून दूर असणारी जान्हवी यामुळे अधिक चर्चेत आली. सोशल मीडियावर तिचे भरपूर फोटो व्हायरल झाले. 



जान्हवी कधीच कोणत्या बॉलिवूड पार्टीमध्ये जुही चावला सोबत पाहायला मिळाली नाही 



जुही चावलाला दोन मुलं आहेत एक जान्हवी आणि दुसरा अर्जुन मेहता 



मीडिया रिपोर्टनुसार दोन्ही मुले ही लंडनच्या चार्टर हाऊस बोर्डिंग स्कूलमध्ये शिकत आहेत. 



जान्हवीने आपलं शालेय शिक्षण धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल शाळेतून केलं आहे 



जान्हवीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, तिची दोन्ही मुलं सिनेमांपासून दूर राहतात 



जान्हवी जुही चावलाची मुलगी लेखक बनू इच्छिते. जान्हवी कायम लो प्रोफाईल राहणं पसंत करते. तसेच ती सोशल मीडियावर देखील अॅक्टीव्ह नाही.