मुंबई: कालाविश्वात दर दिवशी बऱ्याच घडामोडी घडत असतात. पण, गेल्या काही दिवसांपासून या विश्वात चर्चेत मात्र एकच विषय आहे. तो विषय म्हणजे #MeToo चळवळीचा. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लैंगिक शोषणाच्या घटना आणि त्याविषयी होणारे खळबळजनक खुलासे सध्या अनेकांचच लक्ष वेधत आहेत. मुख्य म्हणजे बॉलिवूडमध्ये अशा काही प्रसिद्ध चेहऱ्यांवर हे आरोप करण्यात आले आहेत, जे पाहता अनेकांना धक्काच बसला आहे.


अशा या सर्व परिस्थितीविषयी युट्यूब सेंसेशन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री मल्लिाका दुआ हिने अतिशय सूचक वक्तव्य केलं आहे.


#MeToo विषयी एका वृत्तवाहिनीशी संवाद साधत मल्लिका म्हणाली, की सध्या एकंदरच सुरु असणाऱ्या चर्चा पाहता काही बाबतीत तुम्ही ठाम भूमिका मांडणं अतिशय गरजेचं आहे. कारण, डोळ्यांसमोर जे काही घडतंय त्याकडे तुम्ही दुर्लक्ष करुच शकत नाही.


#MeToo मध्ये उघडकीस येणाऱ्या काहीजणांमध्ये आपल्या संपर्कात असणाऱ्यांची नावं येणं हेसुद्धा खिन्न करणारं असतं, असं मल्लिका म्हणाली. 'ज्यावेळी तुमचे मित्र, सहकारी या साऱ्यात (लैंगिक शोषणाच्या कृत्यात) सहभागी असतात तेव्हा मात्र परिस्थिती कठीण होते. पण, तरीही आता या साऱ्याविषयी खुलेपणाने बोलणं अतिशय महत्त्वाचं झालं आहे', ही ठाम भूमिका तिने मांडली. 


आरोप करण्यात आलेली व्यक्ती तुमच्या संपर्कात आहे किंवा नाही हे महत्त्वाचं नसून या मुद्द्यावर बोललं जाण्याची प्रकर्षाने गरज मात्र आहे. 


मुळात कोणत्याही प्रसंगी तुम्ही योग्य वाटत नसलेल्या गोष्टीला स्पष्ट नकार देणंही तितकच महत्त्वाचं आहे. 


ज्यावेळी एखादा गे मुलगा सर्वसामान्य (स्ट्रेट मॅन) पुरुषाला स्पर्श करण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी हा 'वेगळा' स्पर्श समोरच्या व्यक्तीला कळलेला असतो. त्यामुळे हीच गोष्ट सर्वांसाठी लागू आहे, असं मला वाटतं. 


अनेकदा या गोष्टींमध्ये अधिकारही झळकतो. माझ्याकडे जास्त अधिकार, हक्क आहे, त्यामुळे मी त्याचा वापर करणार अशीच अनेकांची मानसिकता आहे, जी बदलणं अत्यंत गरजेचं असल्याची बाबही तिने अधोरेखित केली.  


मलिक्काने अतिशय महत्त्वाच्या गोष्टी मांडत हे सूचक वक्तव्य केलं. 


दरम्यान मल्लिकाचे वडील, ज्येष्ठ पत्रकार विनोद दुआ यांच्यावरही लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले होते. ज्यानंतर मल्लिकाने त्यांना पाठिंबा दर्शवत आरोप करणाऱ्या व्यक्तीसाठी एक खुलं पत्र लिहिलं होतं. ज्यामधून तिने #MeToo चळवळीतही आपण सहभागी असल्याचं सांगितलं होतं.