मुंबई : स्टारकिड्स आहेत म्हणून त्यांना शिक्षणाची गरज नाही, असं अनेकांना वाटत. पण असं नाही. काही सेलिब्रिटींच्या मुलांनी प्रचंड शिक्षण घेतलं आहे. काहींनी अभिनय आणि शिक्षण क्षेत्रात  धडे गिरवले आहेत, तरी काही स्टारकिड्सने त्यांच्या आवडत्या क्षेत्रात शिक्षण घेतलं आहे. जाणून घेऊ आज कोट्यवधी रुपये कमावणाऱ्या स्टारकिड्सचं शिक्षण....


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अभिनेत्री जान्हवी कपूर
दिग्दर्शक बोनी कपूर आणि दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची मुलगी जान्हवी कपूर ही लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. जान्हवीने मुंबईतील धीरुभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर जान्हवीने अमेरिकेतील ली स्ट्रासबर्ग थिएटर अॅंड फिल्म इन्स्टिट्यूट मधून अभिनयाचं शिक्षण घेतलं आहे. तिचं मानधन देखील कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. 


अभिनेत्री सुहाना खान
अभिनेता शाहरूख खान आणि गौरी खानची मुलगी सुहानाने 'द अर्चिस' सिनेमातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं आहे. तिने शालेय शिक्षण मुंबईतील धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेतून शालेय पूर्ण केले आहे. इंग्लंडच्या आर्डलींग कॉलेजमधून सुहानाने पुढचे शिक्षण घेतले आहे. तर, आता सुहाना न्यूयॉर्क विद्यापीठातून अभिनयात क्षेत्रात तिने पदवी घेतली आहे. 


इब्राहिम अली खान 
इब्राहिम अली खान हा अभिनेता सैफ अली खान आणि अभिनेत्री अमृता सिंगचा मुलगा आहे. इब्राहिम अली खानने मुंबईतील धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्यापुढचे शिक्षण तो इंग्लंडमध्ये घेतलं आहे. आता इब्राहिम लवकरचं बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा रंगत आहे.


नव्या नवेली नंदा
दिग्गज अभिनेते अमिताभ बच्चन यांची नात नव्या नवेली नंदाने लंडनमधील सेव्हनॉक्स स्कूलमध्ये शालेय शिक्षण घेतले आहे. सध्या ती न्यूयॉर्क शहरातील फोर्डहॅम विद्यापीठातून उच्च शिक्षण घेत आहे. नव्याला चित्रपटसृष्टीत करिअर करण्याची इच्छा नसून ती उद्योग क्षेत्रात कामगिरी करणार आहे.


अभिनेत्री अनन्या पांडे
चंकी पांडेची थोरली मुलगी अनन्या पांडे आहे. अनन्याने मुंबईतील धीरूभाई अंबानी आंतरराष्ट्रीय शाळेतून शिक्षण पूर्ण केले आहे. अनन्य पांडे फक्त 12 वी पर्यंत शिक्षण घेतलं आहे. अनन्याने 'स्टूडेंट ऑफ दि ईयर 2' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आता अनन्या अभिनयाच्या जोरावर कोट्यवधी रुपये कमवते.