मुंबई : हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये आपलं कर्तृत्व सिद्ध करणारी अभिनेत्री सोनाली कुलकर्णीला कोणत्याही विशेष ओळखीची गरज नाही. पण आज आम्ही तुम्हाला सोनाली कुलकर्णीचा फॅट ते फिट प्रवास दाखवणार आहोत. जिथे तिने स्वत:ला मेंटेन करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. जी बिल्कूल सोपी नव्हती. रोज जिममध्ये घाम गाळून, सकाळी योगा करून, तसंच हेल्दी डाएट चार्ट फॉलो करून तिने हा फिटनेस प्रवास यशस्वी केला आहे. सोनालीने पांडू या सिनेमासाठी स्वत:च वजन वाढवलं होतं. या नंतर तिने खूप मेहनत घेवून स्वत:ला पुन्हा एकदा मेंटेन केलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सोनाली कुलकर्णी दररोज तिचे फिटनेस व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असते. सोनाली अनेकांसाठी प्रेरणास्थान बनली आहे. सोनाली कुलकर्णीने काही महिन्यांपूर्वी तिचं वजन कमी करण्याचा निर्णय घेतला होता आणि अभिनेत्रीचा हा बदललेला अवतार पाहून चाहत्यांना तिचं वेड लागलं आहे आणि त्यांनी तिला आपलं प्रेरणास्थान मानलं आहे.


सोनाली कुलकर्णी अजय देवगणच्या सिंघम रिटर्न्स आणि ग्रँड मस्ती या चित्रपटात दिसली आहे. तिचा जन्म १८ मे १९९८ रोजी महाराष्ट्रात झाला. सोनालीचे इंस्टाग्रामवर सुमारे 2 मिलियन फॉलोअर्स आहेत. सोनाली कुलकर्णी तिच्या आयुष्याशी संबंधित प्रत्येक  अपडेट चाहत्यांशी शेअर करताना दिसते.



सोनाली तिच्या फिटनेस व्हिडिओंद्वारे लोकांना फिटनेससाठी प्रेरित करताना दिसते. तसंच तिचा डाएट प्लान चाहत्यांसोबत शेअर करते. सोनालीने 2006 मध्ये गौर या मराठी चित्रपटातून तिच्या फिल्मी करिअरची सुरुवात केली.