मुंबई : अभिनेत्री प्राजक्तामाळी तिच्या स्पष्ट वक्तव्यामुळे कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर तिचे असे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. नुकतीच प्राजक्ताने एक मुलाखत दिली आहे. यामध्ये तिला तिच्या लग्नाविषयी प्रश्न विचारण्यात आला आहे. यावंर तिने फार गंमतीशिर पद्धतीने अगदी रोखठोक उत्तर दिलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नुकतीच राजश्री मराठीला प्राजक्ताने मुलाखत दिली यावेळी तिला विचारण्यात आलं की, ''प्राजक्ताचे लग्नाविषयी आता काय विचार आहेत?'' यावर प्राजक्ता म्हणते, ''बापरे डोक्याची मंडळी होणार असेल तर प्लिज नाही. मानसिक शांतता ही माझी PRIORITY आहे सध्या. कारण जर तुमचं डोकं जर जाग्यावर  नसेल तर, कोणाची बिशाद की तुम्हाला एवढं सगळं करायला सुचेल. तिथेच जर घोळ असेल तर नाही. एक लाईफ पार्टनर आहे ना तुमचं आयुष्य सगळं बदलू शकतो. रोजचं तुमचं जगणं. तुमचं भावी आयुष्य, तुमचं फायनान्स, तुमची मेन्टल हेल्थ, तुमची हेल्थ इन जनरल. खूप मोठा निर्णय आहे हा. खूपच आहे हे म्हणजे आणि खूप मोठी रिस्क पण आहे सेम टाईमला आणि ज्या काही मुली असतात ना अशा ज्यांना खूप एक फिजीकल गरजा, इमोशनल गरजा, मेन्टल, फायनाशिअल, सोशल गरज असते. या पाच सहा गरजा आहेत ना आपल्या त्या त्यांना लागतातच लागतात त्यांच्यासाठी हे खूप सोपं आहे


पण आता आपल्या सारख्या मुली की ज्यांना या आणि अध्यात्मामुळे तर मी आणखीन मेंटल, इमोशनल फिजीकल गरजा कमी झालेल्या आहेत.खूप जास्त प्रमाणा कमी झालेली आहे असं मी म्हणेन. तिथं गरजच संपली ना तर मग कशाच्या जीवावर टिकणार आहे ते नातं. फक्त प्रेम आणि विश्वास प्रमाणिक हवा. त्याची गॅरंटी कोण देणार आता कलियुगात. तर तितकं प्रामाणिक तितकं खरं-खुरं असेल ना ते तरच ते टिकेल. तर हे मी आईला समजवते. आईलाही कळतं खरंतर की हे डेन्जरच आहे. एकतर ही समोरच्याची वाट लावेल किंवा काहीतरी होईल एवढं सोप्प नाहीये. तर आपल्या सारख्या मुलींचा ज्या स्वत:च्या पायावर उभ्या असतात बऱ्याच गोष्टींमध्ये एकदम Fully indipendent कधीच असू शकत नाही. कधीच कोणीच नाही होवू शकत. पण खूप मोठा पोर्शन  indipendentcy चा असू शकतो. जो आहे. तिथे थोडा घोळ होतो. 


तर मी प्रेमात पडते मध्ये मध्ये, नंतर मला कळतं की, नाही हा शेवट पर्यंत नसणार आहे. get out of it. मग मी सांगते, ऐक मित्रा सगळं छान आहे पण हा जरा प्रॉब्लेम आहे तर घरी जा. आपण थांबूया असं मी सांगितलेलं आहे. पाच वर्षापुर्वी साधारण  मी असं ऐकाला सांगितलं आहे. तु खोटं बोलतोस माझ्याशी नेहमी आणि मी तुला पकडलेलं आहे. हे हे सगळे त्याचे पुरावे आहेत.  रितसर जय महाराष्ट्र करण्यात आलेलं आहे त्याला. कारण तो खोट बोलतंच होता. आणि बरं तो तेही मान्य करत नव्हता. मग माझं आणखी सटकायची. एक मिनीट तुमच्यात तेवढी स्ट्रेन्थ पाहिजे की, तुम्ही खरं बोललं पाहिजे.'' असं प्राजक्ता या मुलाखतीमध्ये म्हणाली आहे.