मुंबई : रिअॅलिटी शो 'कौन बनेगा करोडपती'चा नववा सिझन लवकरच संपणार आहे. हा शो टेलिव्हिजनवर सध्या टीआरपी यादीत आघाडीवर आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या शोचा अंतिम भाग येत्या ७ नोव्हेंबरला प्रसारित केला जाणार आहे. क्रिकेटर युवराज सिंग आणि अभिनेत्री विद्या बालन या शोमध्ये ६ नोव्हेंबरच्या भागात सहभागी होणार आहेत. 


यामध्ये कॅन्सरशी झुंज देतानाचा अनुभव सांगताना युवराज सिंगला अश्रू अनावर झाले. या भागाचा प्रोमोसुद्धा चॅनेलकडून रिलीज करण्यात आला आहे. 


सूत्रसंचालन करत असलेले बिग बीसुद्धा यावेळी भावूक झाले. जेव्हा युवराज सिंह म्हणाला, 'वर्ल्डकप दरम्यान २०११ साली माझी प्रकृती खूपच खालावली होती. पण, अशातही मी जिद्दीने मैदानावर उभा ठाकलो. १४ सेंटीमीटरचा ट्युमर होता. यावर आता उपचार नाही केले तर तुला वाचवू शकणार नाही असे डॉक्टरांनी म्हटले होते' हा प्रसंग सागंताना युवराजला रडू आलं.


या अंतिम भागासाठी 'केबीसी'च्या प्रसारणाच्या वेळेतही बदल करण्यात आला आहे. रात्री ९ ऐवजी संध्याकाळी ७.३० वाजता हा शो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'अभिनंदन आभार' असे नाव देण्यात आलेला हा भाग ६ आणि ७ नोव्हेंबरला प्रसारित होणार आहे.