मुंबई : 'दंगल' आणि 'सिक्रेट सुपरस्टार' चित्रपटांच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या मनात मानाचं स्थान निर्माण करण्याऱ्या अभिनेत्री झायरा वसीमने बॉलिवूडमधून निरोप घेण्याचा निर्णय घेतला. फेसबूक आणि इन्स्टाग्रामच्या माध्यमातून एक पोस्ट शेअर करत तिने चाहत्यांना मोठा धक्का दिला होता. कमी वयात अप्रतिम कामगिरी करणाऱ्या झायराच्या चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. झायराला अभिनेता सलमान खानच्या 'बिग बॉस १३' शोसाठी ऑफर मिळाल्याची चर्चा सध्या रंगताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

त्याचप्रमाणे झायराला या ऑफरसाठी तब्बल १.५ कोटींचे मानधन देण्यात येणार असल्याचे समोर येत आहे. पण झायराने ही ऑफर नाकारल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे. त्याचप्रमाणे काही दिवसांपूर्वी तिचे सोशल अकाउंट हॅक करण्यात आल्याच्या अफवा पसरल्या होत्या.


यासर्व अफवांना पूर्णविराम देत झायराने 'माझा सोशल अकाउंट न कोणी हॅक केला होता आणि न कोणी करत आहे. ते मी स्वत: हाताळत असल्याचे तिने सांगीतले होते. झायराने नुकतीच ‘द स्काय इज पिंक’ या चित्रपटाची शूटिंग पूर्ण केली. यामध्ये तिच्यासोबत प्रियांका चोप्रा व फरहान अख्तर देखील झळकणार आहेत. कदाचित रूपेरी पडद्यावरचा हा तिचा शेवटचा चित्रपट ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.