Guest Who : धर्मासाठी `या` अभिनेत्रीने सोडलं बॉलिवूड, आता तरी ओळखलं का?
Bollywood Actors Childhood Photos : आम्हाला सांगा तुम्ही या गोड मुलीला ओळखलं का? या अभिनेत्रीला तिच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालं आहे. सगळ्यात महत्त्वाचं 2019 मध्ये या अभिनेत्रीने बॉलिवूडला रामराम ठोकला आहे.
Zaira Wasim Birthday Special : बॉलिवूडमधील अभिनेता आणि अभिनेत्री त्यांचा (Bollywood Actors Childhood Photos) लहानपणी कसे दिसतं होता हे जाणून घ्यायला चाहते खूप उत्सुक असतात. आज आम्ही असाच एक गोंडस चिमुकलीचा फोटो तुमच्यासमोर आणला आहे. आम्हाला सांगा तुम्ही या गोड मुलीला ओळखलं का? या अभिनेत्रीला तिच्या अभिनयासाठी राष्ट्रीय पुरस्कार देखील मिळालं आहे. सगळ्यात महत्त्वाचं 2019 मध्ये या अभिनेत्रीने बॉलिवूडला रामराम ठोकला आहे.
ओळलं का हिला?
ही आहे छोट्याशा कारकिर्दीत विशेष छाप पाडणारी आणि 'दंगल' (Dangal) गर्ल अभिनेत्री झायरा वसीम (Zaira Wasim) ....झायरा आज तिचा 22 वा वाढदिवस (Birthday) साजरा करत आहे. बॉलिवूडमध्ये यशाच्या शिखरावर असताना साधारण तीन वर्षांपूर्वी झायराने बॉलिवूडला टाटा-बायबाय केलं. तिच्या या निर्णयानंतर बॉलिवूडसह चाहत्यांनाही मोठा धक्का बसला होता. दंगल गर्लमधून प्रसिद्ध झोतात आलेली झायराने सिक्रेट सुपरस्टारमधून पुन्हा प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. (Zaira Wasim Birthday Special childhood photo nmp)
बॉलिवूडला का केला रामराम?
प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) आणि फरहान अख्तरचा (Farhan Akhtar) 2019 मध्ये रिलीज झालेल्या 'द स्काय इज पिंक' (the sky is pink) या चित्रपट झायरासाठी शेवटचा ठरला. या चित्रपटाचं शूटिंग पूर्ण झाल्यानंतरच झायराने चित्रपटसृष्टी सोडण्याची घोषणा केली. त्यातच शोबिजशी संबंध तोडण्याचा निर्णय ऐकून चाहत्यांना आश्चर्यचकित झाले होते. या निर्णयानंतर झायराने सोशल मीडियावर एक पोस्ट टाकली होती. त्यात ती म्हणाली की, बॉलीवूडमध्ये आल्याने ती अल्लाह आणि इस्लामपासून कशी दूर गेली आहे.
लहानपणापासून होती अभिनयाची आवड
झायराचा जन्म काश्मीरमधील श्रीनगरमध्ये झाला. झायराने सुरुवातीचे शिक्षणही तिथेच केलं. शालेय जीवनापासून झायराला अभिनयाची खूप आवड होती. बॉलिवूड सोडण्याचा निर्णयानंतर झायराने इंस्टाग्रामवरुन सगळे फोटो काढून टाकले. गेल्या वर्षी मात्र तिचा एक बुरखातील फोटो तिने सोशल मीडियावर शेअर केला होता. मात्र याही फोटोमध्येही तिने तिचा चेहरा दाखविला नाही. मात्र तिचा एक बालपणीचा फोटो तिने सोशल मीडियावर ठेवला आहे.