Zara Hatke Zara Bachke Box Office Day 1 Collection : बॉलिवूड अभिनेता विकी कौशल आणि सारा अली खान यांचा काल म्हणजेच 2 जून रोजी ‘जरा हटके जरा बचके’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटात त्या दोघांना पहिल्यांदा एकत्र स्क्रिन शेअर करताना पाहण्यासाठी प्रेक्षक आणि त्यांचे चाहते चांगलेच आतुर होते. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून आणि त्यानंतर या दोघांनी केलेल्या प्रमोशनमुळे सतत चर्चेत होता. आता चित्रपट काल प्रदर्शित झाला आहे. त्याची प्रेक्षक आतुरता करत होते. हा चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रेक्षक आतुरतेनं प्रतिक्षा करत होते. आता चित्रपटानं पहिल्याच दिवशी किती कोटींचा आकडा पार केला ते जाणून घेऊया. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटानं पहिल्याच दिवशी किती कोटींची कमाई केली याविषयी आपण जाणून घेणार आहोत. खरंतर याची माहिती चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी शेअर केली आहे. चित्रपटानं पहिल्याच दिवशी 5.49 से 6 कोटींची कमाई केली. या चित्रपटानं पहिल्याच दिलशी चांगली कमाई केली आहे. ‘इंडिया टीव्ही’च्या वृत्तानुसार, पहिल्या दिवशी चित्रपटाने जवळपास पाच कोटी रुपयांचा गल्ला केला आहे.



दरम्यान, 'उरी: द सर्जिकल स्ट्राइक' या चित्रपटानंतर पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर सगळ्यात जास्त कमाई करणार हा विकीचा दुसरा चित्रपट आहे. तर 'सिम्बा', 'लव आज कल' आणि 'केदारनाथ' या चित्रपटानंतर सगळ्यात जास्त कमाई करणारा हा दुसरा चित्रपट आहे. ‘जरा हटके जरा बचके’ या चित्रपटानं हिंदीच 3.35 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ट्रेडनुसार, विकी आणि सारा अली खान यांच्या या चित्रपटानं त्यांच्या जॉनरात प्रदर्शित झालेल्या इतर चित्रपटांमध्ये चांगली कमाई केली आहे. जर चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर अशीच सुरु राहिलं तर हा चित्रपट पहिल्याच आठवड्यात 22 ते 25 कोटींची कमाई करू शकतो. 


हेही वाचा : Amitabh - Jaya Bachchan यांच्या लग्नाला 50 वर्ष पूर्ण, लेकीनं सांगितलं यशस्वी नात्याचं रहस्य


या चित्रपटात सारा अली खान आणि विकी कौशल हे एका वैवाहिक जोडप्याच्या भूमिकेत आहेत. त्यांच्या नात्यात होणाऱ्या वादाला पाहता ते घटस्फोट घेण्यासाठी पुढे येत असल्याचे दिसते. या चित्रपटाचे दिग्दर्शन मैत्रेय बाजपेयी आणि रमीझ खान यांनी केले आहे. तर मॅडॉक फिल्म्स यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. दरम्यान, या चित्रपटाला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळत आहे. तर विकेंड पाहता चित्रपटाच्या नाईट शोमध्ये वाढ होऊ शकते. तर हा चित्रपट प्रेत्रकांच्या पसंतीस उतरला आहे असे काही प्रेक्षकांचे म्हणणे आहे.