जायद खानकडे 1500 कोटींची संपत्ती? फ्लॉप चित्रपटांनंतर श्रीमंत कसा सांगत म्हणाला, `तुम्ही फेरारी...`
Zayed Khan Net Worth Rs 1500 Crore : जायद खानची एकूण संपत्ती ही 1500 कोटींची! अभिनेता खुलासा करत म्हणाला...
Zayed Khan Net Worth Rs 1500 Crore : 'मैं हूँ ना' या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात घर करणारा बॉलिवूड अभिनेता जायद खान हा आता जास्त चित्रपटांमध्ये दिसत नसला तरी चर्चेत असतो. त्याच्या करिअरमध्ये अनेक अप्स आणि डाउन्स त्यानं पाहिले. मात्र, आता त्याचं चर्चेत येण्याचं कारण त्याची नेटवर्थ आहे. त्याची नेटवर्थ ही 1500 कोटी रुपये आहे. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याला त्याच्या नेटवर्थविषयी विचारण्यात आलं आहे. त्यावेळी त्यानं त्याची नेटवर्थ सांगितली आहे.
जायद खाननं ही मुलाखत सुभोजित घोषला दिली आहे. या मुलाखतीत जायदला त्याची एकूण नेटवर्थ ही 1500 कोटींची आहे असं विचारण्यात आलं तर तो हसू लागला आणि म्हणाला की 'तो पैशांच्या मॅनेजमेंटला महत्त्व देतो. मनी मॅनेजमेंटविषयी सांगतना जायद खान म्हणाला, जर मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला आश्चर्य होईल की तुम्ही त्याच्याविषयी आधी विचार का केला नाही. एक म्हण आहे की जर तुम्ही फेरारी खरेदी करू शकता. तर मर्सिडीज विकत घ्या आणि जर तुम्ही मर्सिडीज खरेदी करु शकता, तर फिएट खरेदी करा. आपण या सोशल मीडियाच्या जगात, जिथे तुमची इमेज... तुम्ही असं आयुष्य जगत आहात जिथे तुम्ही ही गोष्ट सहन करू शकणार नाही. काही लोकं खरंच चांगलं करत आहेत. पण त्यातील 80 टक्के लोकं चांगलं करत नाही आहेत. ते कंगाल होत आहेत. त्यांच्याकडे ईएमआय, कर्ज आहे आणि मग ते मुर्खपणासारख्या गोष्टी करतात.'
जायदनं पुढे सांगितलं की "ज्यानं त्यानं ज्याच्या त्याच्या क्षमतेनुसार जगायला हवं. नको तो दिखावा करायची गरज नाही. तुमच्या आयुष्यात फक्त शिष्टाचार आहे जो दाखवला जातो. अशात त्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करा ज्यानं तुम्हाला फायदा होईल आणि तुम्ही आयुष्यात प्रगती करू शकाल. आकडा हळू-हळू वाढू लागतील. पण तुमच्या क्षमतेनुसार विचार करा. तुम्हाला रोज काही शिकण्याची गरज नाही किंवा तुम्ही ज्या ठिकाणांहून येतात त्याची लाज वाटून घेण्याची गरज नाही. फक्त तुम्ही जे आहात तेच राहा. एक म्हण आहे, 'मुझे नहीं पता कि सफलता का रास्ता क्या है, लेकिन असफलता का पक्का रास्ता सभी को खुश करना है।"
जायदनं पुढे सांगितलं की "एका विशिष्ठप्रकारे जगण्याचा दबाव असणं हे भयानक, अश्लील आणि गुन्हेगारी आहे. जायदनं सांगितलं की मला माहित नाही की तरुणांसाठी हा पुढे जाण्याचा मार्ग आहे की नाही, पण हिंम्मत ठेवा, चरित्रवान व्हा. एक लोकप्रिय म्हण आहे की जगाला योद्धांची गरज आहे, पॅरासाइट्सची नाही. हे तुमच्यावर अवलंबून असतं की तुम्हाला पॅरासाइट व्हायचं आहे की योद्धा."