This Actor Wanted His Debut Film to Flop : बॉलिवूड अभिनेता सलमान खाननं त्याच्या करिअरमध्ये एकापेक्षा एक असे गाजलेले चित्रपट दिले आहेत. अनेक सुपरहिट आणि ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये देखील त्यानं काम केलं आहे. पण त्यानं त्याच्या करिअरमध्ये अशा देखील चित्रपटांमध्ये काम केलं आहे जे फ्लॉप झाले, तर काही चित्रपट फ्लॉप व्हावे अशी प्रार्थना त्यानं स्वत: केली होती. तर असे कोणते चित्रपट होते जे फ्लॉप व्हावे याची प्रार्थना सलमाननं केली होती.
सलमान खाननं 1988 मध्ये 'बीवी हो तो ऐसी' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. या चित्रपटात त्याच्यासोबत महत्त्वाच्या भूमिकेत अभिनेत्री रेखा होत्या. पण त्याच्या काही दिवसानंतर त्यानं 'मैंने प्यार किया' मध्ये मुख्य भूमिका साकारण्याची संधी मिळाली. पण त्यानंतर तो देवाकडे प्रार्थना करू लागला की त्याचा पहिला चित्रपट हा फ्लॉप झाला पाहिजे. पण असं कोणताही कलाकार कसं बोलू शकतो असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर हे खरं आहे सलमाननं अशी देवाकडे प्रार्थना केली होती.
सलमाननं त्याच्या करिअरची सुरुवातीला खूप संघर्ष केलं. बीवी हो तो ऐसीमध्ये त्याला खूप संघर्ष केल्यानंतर संधी मिळाली होती. या चित्रपटात साइड आर्टिस्ट म्हणून त्याला संधी मिळाली होती. त्याचा हा चित्रपट हिट झाला होता. पण सलमानचं नाव कुठेही नव्हतं. सलमानचा मैंने प्यार किया’ हा चित्रपट 1989 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटात सलमान खान आणि भाग्यश्रीची जोडी दिसली होती. त्यांची जोडी प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. त्यांच्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर सगळ्यांचं लक्ष वेधलं होतं.
या चित्रपटाला मिळालेलं यश पाहता सलमानच्या करिअरला एक नवी सुरुवात मिळाली होती. त्याचं कारण म्हणजे त्याच्या समोर वेगवेगळ्या संधी येऊ लागल्या होत्या. यामुळे सलमानचं असं झालं होतं की "रेखा यांच्या सोबत केलेल्या चित्रपटात ज्यात त्यानं डेब्यू केला होता तो चित्रपट फ्लॉप झाला पाहिजे. सलमान खानला या चित्रपटात स्क्रिन स्पेस खूप कमी मिळाला होता. त्यानं एका मुलाखतीत खुलासा केला की मैंने प्यार किया या चित्रपटाची मला ऑफर मिळाली आणि मी देवाकडे प्रार्थना करू लागलो की बीवी हो तो ऐसी हा चित्रपट फ्लॉप झाला पाहिजे. जेणेकरून 'मैंने प्यार किया' या चित्रपटातून माझा डेब्यू होऊ शकेल."
|
IND
(20 ov) 167/8
|
VS |
AUS
119(18.2 ov)
|
| India beat Australia by 48 runs | ||
| Full Scorecard → | ||
|
NEP
(50 ov) 239/9
|
VS |
UAE
243/6(49.1 ov)
|
| United Arab Emirates beat Nepal by 4 wickets | ||
| Full Scorecard → | ||
|
USA
(50 ov) 292/3
|
VS |
UAE
49(22.1 ov)
|
| USA beat United Arab Emirates by 243 runs | ||
| Full Scorecard → | ||
By accepting cookies, you agree to the storing of cookies on your device to enhance site navigation, analyze site usage, and assist in our marketing efforts.