मुंबई : सलगच्या नवनवीन सीरिज आणि मनोरंजनाच्या निखळ मनोरंजनाची जबाबदारी घेणाऱ्या 'झी 5' नं आणखी एक नजराणा प्रेक्षकांच्या भेटीला आणण्याचा निर्ण घेतला आहे. ज्या निमित्तानं प्रेक्षकांना एका वेगळ्या विश्वाची सफर घडणार आहे. ही सफर आहे, 'यारा' च्या दुनियेची. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'झी 5' ने चार कुख्यात अपराध्यांच्या मैत्रीची एक अविस्मरणीय कहानी सर्वांच्या भेटीला आणली आहे. ज्याचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित केला आहे. ‘यारा’मध्ये विद्युत जामवाल, अमित साध, विजय वर्मा आणि श्रुती हासन यांच्या यामध्ये मुख्य भूमिका आहेत. उत्तेजक आणि रोमांचकारी असा हा ‘यारा’ चा ट्रेलर 'फागुन', 'मितवा', 'रिजवान' आणि 'बहादुर' यांच्या भावुक कहाणीवर भाष्य करतो. जे मोठेपणी मैत्री आणि अपराधामध्ये भागीदार बनतात. 


‘यारा’ हा एक क्राइम ड्रामा आहे जो चार कुख्यात अपराध्यांमध्ये असलेल्या मैत्रीला समोर आणतो. उत्तर भारताच्या पार्श्वभूमीवर स्थित या कथानकाला इतिहासाचं पुसटसं आवरण आहे. ही नेपाल-भारत सीमेवर संघर्ष करणाऱ्या चौकड़ी गँगमधल्या 4 मित्रांच्या सफल असफलतेची कहाणी आहे. फीचर फिल्म ‘ए गैंग स्टोरी’ वर 'यारा', अधारलेला आहे.



 


आपण खऱ्याखुऱ्या जीवनात अनुभवणाऱ्या एका मैत्रीची कहाणी आहे, ज्याद्वारे तुम्ही त्यातील चार पात्रांपैकी कोणामध्येतरी स्वत:ला अनुभवाल, असं 'यारा'विषयी सांगताना विद्युत जामवाल म्हणाला.