मुंबई : मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते अशा प्रतिष्ठित झी गौरव २०२० पुरस्कारांचं नामांकन ६ मार्च २०२० रोजी पार पडलं होतं. त्यानंतर संपूर्ण जगावर कोरोनाचं संकट कोसळलं आणि लॉकडाऊन घोषित झाला. लॉकडाऊनमुळे चित्रपटांचं शुटींग थांबलं. चित्रपट आणि नाट्यगृह बंद होती. पण आता चित्रपट आणि नाट्यगृह जरी बंद असले तरी चित्रीकरणाला परवानगी मिळाली आहे. हळूहळू सगळेच अनलॉकच्या दिशेने वाटचाल करत आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२१ व्या "झी गौरव" ची नामांकन जरी जाहीर झाली असली तरी यंदा हा पुरस्कार सोहळा होणार की नाही असं अनेकांना वाटत होतं. पण झी मराठीने मानाच्या झी गौरव पुरस्कारात खंड पडू दिला नाही. मर्यादित कलाकार, तंत्रज्ञ आणि सरकारचे सगळे नियम पाळून हा पुरस्कार सोहळा पार पडला. चित्रपट, नाट्यश्रृष्टीत पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण झालं. मराठी चित्रपटसृष्टीसाठी ऑस्कर समजला जाणारा मानाचा 'झी चित्र गौरव' पुरस्कार जाहीर झाला. झी गौरव पुरस्काराचं यंदाचं हे २१ व वर्ष होते.


आदिनाथ कोठारे आणि डॉ. निलेश साबळे यांच खुसखुशीत सूत्रसंचालन, 'सिद्धार्थ जाधव आणि सोनाली कुलकर्णी' यांचा डान्स परफॉर्मन्सने कार्यक्रमात बहार आणली.


या वर्षी 'जीवन गौरव' पुरस्काराचे मानकरी जेष्ठ अभिनेत्री 'रोहिणी हट्टंगडी' आणि जेष्ठ अभिनेते 'दिलीप प्रभावळकर' ठरले आहेत. तसेच या वर्षीचा 'मराठी पाऊल पडते पुढे' पुरस्कार 'तानाजी' चित्रपटाचा दिग्दर्शक ओम राऊत यांना घोषित झाला.


या वेळी 'आनंदी गोपाळ, आटपाडी नाईट्स' या चित्रपटांनी सर्वाधिक पुरस्कार पटकावले. 'आदर्श कदम आणि वेदश्री खाडिलकर' यांना 'खारी बिस्कीट' आणि ‘आर्यन मेंघजी’ याला ‘बाबा’ या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट बालकलाकार पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला 'ललित प्रभाकर' आनंदी गोपाळ आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरली 'सायली संजीव' आटपाडी नाईट्स. तर या वर्षीचा सर्वोत्कृष्ट चित्रपट ठरला 'आटपाडी नाईट्स'


झी चित्र गौरव पुरस्कार सोहळा प्रेक्षकांना १३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ७ वाजता पाहता येणार आहे.


झी चित्र गौरव - २०२० चे मानकरी 


झी चित्र गौरव जीवन गौरव पुरस्कार २०२०
रोहिणी हट्टंगडी 
दिलीप प्रभावळकर


सर्वोत्कृष्ट कलादिग्दर्शन 
स्माईल प्लीज - असित कुमार चत्तूई


सर्वोत्कृष्ट वेशभूषा  
बाबा - सचिन लोवलेकर


सर्वोत्कृष्ट रंगभूषा  
आनंदी गोपाळ - डी. एन. येरकर


सर्वोत्कृष्ट ध्वनिरेखाटण 
गर्लफ्रेंड - अविनाश सोनावणे 


सर्वोत्कृष्ट छायाचित्रण 
आनंदी गोपाळ - आकाश अग्रवाल 


सर्वोत्कृष्ट नृत्यदिग्दर्शन  
गर्लफ्रेंड - राहुल ठोंबरे, संजीव हवालदार 


सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत 
गर्लफ्रेंड - सौरभ भालेराव


सर्वोत्कृष्ट पार्श्वगायक 
जसराज जोशी - केरिदा केरिदा - गर्लफ्रेंड


सर्वोत्कृष्ट संगीत दिग्दर्शन 
ह्रुषिकेश दातार, जसराज जोशी, सौरभ भालेराव - आनंदी गोपाळ 


सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिका  
आनंदी जोशी - आनंदघन - आनंदी गोपाळ


सर्वोत्कृष्ट गीतकार 
वैभव जोशी - आनंदघन - आनंदी गोपाळ


सर्वोत्कृष्ट संकलन 
गर्लफ्रेंड - फैझल  इम्रान 


सर्वोत्कृष्ट कथा  
आटपाडी नाईट्स - नितिन सुपेकर


सर्वोत्कृष्ट पटकथा
आटपाडी नाईट्स - नितिन सुपेकर


सर्वोत्कृष्ट संवाद  
आटपाडी नाईट्स - नितिन सुपेकर


सर्वोत्कृष्ट बालकलाकार 
आदर्श कदम - वेदश्री खाडिलकर (खारी बिस्किट)
आर्यन मेंघजी (बाबा)


सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता
सतीश आळेकर(स्माईल प्लीज)


सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री 
नंदिता पाटकर (खारी बिस्कीट)


सर्वोत्कृष्ट अभिनेता 
ललित प्रभाकर (आनंदी गोपाळ)


सर्वोत्कृष्ट अभिनेत्री 
सायली संजीव (आटपाडी नाईट्स)


सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन 
नितिन सुपेकर(आटपाडी नाईट्स)


सर्वोत्कृष्ट चित्रपट 
आटपाडी नाईट्स