Ajinkya Raut Buy New Car : मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट बॉय म्हणून अभिनेता अजिंक्य राऊतला ओळखले जाते. तो कायमच विविध कारणांनी चर्चेत असतो. झी मराठीवरील ‘मन उडू उडू झालं’ या मालिकेमुळे अजिंक्य राऊत हा प्रसिद्धीझोतात आला. या मालिकेमुळे त्याने प्रेक्षकांच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे. सध्या अजिंक्य हा सोनी मराठी वाहिनीवरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’ या मालिकेत झळकत आहे. या मालिकेत तो राजवीर हे पात्र साकारत आहे. आता अजिंक्यने एक नवा 'कार'नामा केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अजिंक्य राऊत हा सोशल मीडियावर कायमच सक्रीय असतो. तो विविध फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करत असतो. आता अजिंक्यने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. याद्वारे त्याने चाहत्यांना एक गुडन्यूज दिली आहे. अजिंक्यने नवीन कार खरेदी केली आहे. त्याने या नवीन कारची झलकही दाखवली आहे. 


अजिंक्य राऊतची इन्स्टाग्राम पोस्ट


"आनंदी, सोपे आणि समाधानी जीवन. तुमची सगळी स्वप्ने प्रत्यक्षात यावीत आणि ही सर्व स्वप्न पूर्ण होण्याचा आनंद त्यांच्या डोळ्यात दिसावा, ज्यांनी तुमची प्रगती होताना पाहिली आहे. याक्षणी मला माझ्या कुटुंबाची प्रचंड आठवण येत आहे. पण मला माहिती आहे की त्यांना देखील निश्चित आनंद झाला आहे. त्याबरोबरच त्यांना माझा अभिमान देखील वाटत आहे", असे कॅप्शन त्याने ही गुडन्यूज देताना दिले आहे. 



 दरम्यान अजिंक्य राऊतने विठू माऊली या मालिकेतून सिनेसृष्टीत पदार्पण केले. या मालिकेत त्याने श्री विठ्ठलाची भूमिका साकारली होती. त्यानंतर तो मन उडू उडू झालं या मालिकेत झळकला. यात त्याने साकारलेली इंद्रा ही भूमिका प्रचंड गाजली.  त्याबरोबरच टकाटक, टकाटक 2 या चित्रपटातही त्याने काम केले आहे. सध्या तो ‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘अबोल प्रीतीची अजब कहाणी’मध्ये झळकत आहे. या मालिकेत त्याने राजवीर हे पात्र साकारले आहे. त्याबरोबरच तो लवकरच 'कन्नी' या चित्रपटातही झळकणार आहे.