राधिका आणि गुरुनाथला एकत्र आणण्यात यशस्वी ठरणार का सौमित्र?
लोकप्रियता आणि टीआरपीचा उच्चांक गाठलेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका आणि त्यातील पात्र प्रेक्षकांच्या मानत घर करून बसली आहेत. या मालिकेत नुकताच प्रेक्षकांनी राधिकाचा कायापालट पहिला. उद्योजिका बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या राधिकाने पाहता पाहता स्वतःचे ऑफिस देखील चालू केले. मालिकेत झालेल्या सौमित्र म्हणजेच अद्वैत दादरकरच्या एन्ट्रीने गुरुचीमात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे. येत्या रविवारी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या १ तासाच्या विशेष भागात राधिका तिच्या सहकाऱ्यांसोबत शिर्डीला जाणार आहेत.
मुंबई : लोकप्रियता आणि टीआरपीचा उच्चांक गाठलेली माझ्या नवऱ्याची बायको ही मालिका आणि त्यातील पात्र प्रेक्षकांच्या मानत घर करून बसली आहेत. या मालिकेत नुकताच प्रेक्षकांनी राधिकाचा कायापालट पहिला. उद्योजिका बनण्याचं स्वप्न पाहणाऱ्या राधिकाने पाहता पाहता स्वतःचे ऑफिस देखील चालू केले. मालिकेत झालेल्या सौमित्र म्हणजेच अद्वैत दादरकरच्या एन्ट्रीने गुरुचीमात्र चांगलीच तारांबळ उडाली आहे. येत्या रविवारी माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेच्या १ तासाच्या विशेष भागात राधिका तिच्या सहकाऱ्यांसोबत शिर्डीला जाणार आहेत.
गुरु आणि शनाया देखील तिकडे त्यांना धडकणारआहेत. राधिका आणि गुरूला एकत्र आणण्यासाठी सौमित्रने प्लॅन बनवला आहे. त्याच वेळी राधिका आणि गुरुनाथ ने एका कंपनीत टेंडर भरले आहे, पण कर्म धर्म सहयोगाने हे काम राधिका आणि गुरुनाथच्या कंपनीमध्ये ५० ५०% विभागून मिळाले आहे. आता गुरु आणि राधिका कामात एकमेकांची मदत कितपत घेतील तसेच शिर्डीमध्ये सर्व एकत्र असलेल्या संधीचा फायदा घेऊन सौमित्र राधिका आणि गुरूला एकत्र आणण्याकरिता काय काय युक्त्यालढवतो आणि त्यात तो यशस्वी ठरतो का? हे पाहणे रंजक ठरेल
तेव्हा पाहायला विसरू नका माझ्या नवऱ्याची बायको मालिकेचा एक तासाचा विशेष भाग रविवार १५ एप्रिल संध्याकाळी 7.00 वाजता फक्त आपल्या झी मराठीवर.