मुंबई : झी मराठी ही वाहिनी नेहमीच विविध व रंजक विषयांची योग्यरीत्या हाताळणी आणि सादरीकरणातील नावीन्याने महाराष्ट्रातील तमाम जनतेचं गेल्या २० वर्षांपासून भरभरून मनोरंजन करत आली आहे. वय विसरायला लावणारी जगावेगळी प्रेम कहाणी घेऊन झी मराठी वेगळ्या धाटणीची मालिका प्रेक्षकांसाठी सादर करत आहे. 'तुला पाहते रे' या मालिकेतून अभिनेता सुबोध भावे आता पुन्हा एकदा 'झी मराठी'वर पुनरागमन करत छोट्या पडद्यावर आपली जादू दाखवणार आहे. तब्बल दोन वर्षांनंतर तो टीव्ही मालिकेकडे पररतो आहे. ‘तुझं माझं ब्रेकअप’ ही मालिका आता प्रेक्षकांचा निरोप घेणार असून त्याजागी 'तुला पाहते रे' ही नवी मालिका १३ ऑगस्ट पासून रात्री ८.३० वाजता प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वय विसरायला लावतं ते खरं प्रेम असं म्हणणारी 'तुला पाहते रे' ही मालिका आहे ईशा आणि विक्रम सरंजामे यांच्या प्रेमाची. विक्रम सरंजामे म्हणजे शहरातील एक मोठा बिझनेसमॅन. खूप श्रीमंत, आलिशान घर असलेला विक्रम आणि दुसरीकडे चाळीत, मध्यमवर्गीय कुटुंबात राहणारी इशा निमकर जी अतिशय सामान्य पार्श्वभूमीच्या वाढली आहे. हे दोघे कसे भेटतात, त्यांची मैत्री कशी होते आणि त्या मैत्रीचं प्रेमात कधी रुपरंतर होतं हे पाहणं प्रेक्षकांसाठी रंजक ठरेल. मालिकेचे सर्व प्रोमो पाहता मालिकेत भव्यता दिसून येते. या मालिकेतून पुण्याची ‘गायत्री दातार’ ही नवोदित अभिनेत्री छोट्या पडद्यावर पदार्पण करत आहे.


तेव्हा विक्रम आणि ईशाची परिकथेतील प्रेमकहाणी पाहायला विसरू नका १३ ऑगस्ट पासून सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर!!!