मुंबई : कोरोना व्हायरसचा परिणाम दैनंदिन जीवनावर होताना दिसत आहे. कोरोनाने आर्थिक व्यवहार देखील ठप्प केले आहेत. गर्दीची ठिकाणं टाळा, नागरिक एकत्र येतील असे कार्यक्रम टाळा असं सरकारकडून आवाहन केलं जात असताना झी मराठीने महत्वाचा निर्णय घेतला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सिनेसृष्टीत मानाचा समजला जाणारा झी नाट्य आणि चित्र गौरव पुरस्कार पुढे ढकलण्यात आला आहे. १३ मार्च रोजी पुरस्कार सोहळा रंगणार होता. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुरस्कार पुढे ढकलण्यात आला आहे. या सोहळ्याला फक्त कलाकार मंडळी आणि निमंत्रितच उपस्थित असतील. गर्दी टाळण्यासाठी प्रेक्षकांचा सहभाग या कार्यक्रमात नसेल. यामुळे यंदाचा पुरस्कार हा अतिशय मोजक्या कलाकारांसोबत संपन्न होणार आहे. (शेवंता फेम अपूर्वा नेमळेकरला झी गौरव 2020 कडून अपेक्षा)



झीचा पुरस्कार सोहळा हा प्रत्येक प्रेक्षकांसाठी पर्वणीच असते. यावेळी आपल्या आवडत्या कलाकारांना जवळून पाहण्याची संधी मिळते. त्याचप्रमाणे कलाकारांच्या कामाचं कौतुक होताना पाहायला मिळतं. मात्र आता कोरोना व्हायरसने महाराष्ट्रातच काय तर मुंबईत प्रवेश केला आहे. मुंबईत कोरोनाची लागण झालेले दोन रूग्ण आढळले आहेत. ज्यांच्यावर कस्तुरबा रूग्णालयात उपचार सुरू आहे. असं असताना सोहळ्याकरता मोठ्या संख्येने लोकांनी एकत्र जमा होणं हे योग्य नाही. या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे. (झी गौरव २०२० नामांकन सोहळ्यात कलाकारांचा 'सॉल्लिड' स्टाईल फंडा) 


 



झी गौरव नॉमिनेशन पार्टी नुकतीच मुंबईत संपन्न झाली. या पार्टीला सर्वच कलाकारांची उपस्थिती होती. मात्र मुंबईत दोन कोरोनाचे रूग्ण सापडल्यानंतर पुढील पुरस्कार सोहळे पुढे ढकलण्यात आले आहेत.