मुंबई : मराठी नाट्य आणि चित्रपट सृष्टी ज्याची आतुरतेने वाट पाहत असते अशा प्रतिष्ठित  झी गौरव २०२० पुरस्काराची नामांकनं ६ मार्च २०२० दिमाखदार सोहोळ्यात पार पडली, त्यानंतर देशावरच नाही तर संपूर्ण जगावर कोरोना च संकट कोसळलं आणि लॉकडाऊन घोषित झाला. लॉकडाऊनमुळे नाटकाचे प्रयोग आणि दौरे थांबले  नाट्यगृह बंद झाली, पण आता नाट्यगृह जरी बंद असली तरी हळूहळू आपण अनलॉक च्या दिशेने वाटचाल करतोय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२१ व्या "झी गौरव" ची नामांकन जरी जाहीर झाली असली तरी यंदा हा पुरस्कार होणार नाही असच सर्वाना वाटत होतं. पण झी मराठी ने ठरवलं कि मानाच्या झी गौरव पुरस्कारात खंड पडू द्यायचा नाही, मर्यादित कलाकार, तंत्रज्ञ आणि सरकारचे सगळे नियम पाळून हा पुरस्कार सोहोळा करण्याचे ठरले आणि नाट्यश्रुष्टीत पुन्हा एकदा नवचैतन्य निर्माण झालं. मराठी नाट्यश्रुष्टी साठी ऑस्कर समजला जाणारा मानाचा “झी नाट्य गौरव” पुरस्कार जाहीर झाले. झी गौरव पुरस्काराचं यंदाचं हे २१ व वर्ष. ‘विनय येडेकर आणि अतुल परचुरे’ यांच खुसखुशीत सूत्रसंचालन ने कार्यक्रमात बहार आणली.


या वर्षी “जीवन गौरव” पुरस्काराचे मानकरी ठरले जेष्ठ अभिनेते 'रवी पटवर्धन' आणि 'सतीश आळेकर'. यावर्षी परफॉर्मन्स ऑफ द इयर अभिनेत्री - समिधा गुरु, ज्युरी पुरस्कार - अशोक सराफ (नाटक व्हॅक्युम क्लिनर), विशेष लक्ष्यवेधी नाटक - थोडं तुझं थोडं माझं यांना घोषित झाले.


' शांतेचं कार्ट, वस्त्रहरण, संशय कल्लोळ, अलबत्या गलबत्या, हॅम्लेट, आणि मराठीबाणा' या नाटकांची झलक हे यावर्षीच्या "झी नाट्य गौरव २०२०" चं खास आकर्षण असणार आहे. यावेळी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री ठरल्या 'वंदना गुप्ते' 'हरवलेल्या पत्त्यांचा बंगला' या नाटकासाठी, आणि सर्वोत्कृष्ट अभिनेता ठरला 'सुमित राघवन' क्नॉक-क्नॉक सेलिब्रिटी या नाटकासाठी. यावर्षीच सर्वोत्कृष्ट व्यावसायिक नाटक ठरलं "आमने सामने" आणि सर्वोत्कृष्ट प्रायोगिक नाटक ठरलं "बारोमास". या प्रायोगिक नाटकाला रुपये १ लाखाचे विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. हा सोहळा तुम्हाला पाहता येणार आहे २० सप्टेंबर रोजी संध्याकाळी 7 वा. फक्त आपल्या 'झी मराठीवर.