मुंबई : झी स्टुडिओ लवकरच भारतातील पहिल्या महिल्या डॉक्टर आनंदीबाई जोशी यांचा प्रवास रुपेरी पडद्यावर मांडणार आहे. 'आनंदी गोपाळ' असं या सिनेमाचं नाव असून याचं मोशन पोस्टर रिलीज करण्यात आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

15 फेब्रुवारी 2019 रोजी 'आनंदी गोपाळ' या सिनेमातून यांचा जीवनप्रवास उलघडणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन समीर विद्वंस करत आहेत. 


आनंदीबाई जोशी हे नाव फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण जगात मोठ्या आदरानं घेतलं जातं. अगदी प्रतिकूल परिस्थितीत आनंदीबाई शिकल्या आणि भारतातील पहिल्या महिला डॉक्टर होण्याचा मान त्यांनी मिळवला. 



या सिनेमात प्रमुख भूमिकेत कोण असणार याबाबत अद्याप कोणतीच माहिती समोर आलेली नाही. श्री. ज. जोशी यांनी ‘आनंदी गोपाळ’ यांच्यावर कादंबरी लिहिली होती. या कादंबरीवर आधारित नाटकही रंगभूमीवर आलं होतं.



अगदी न कळत्या वयात म्हणजे दहाव्या वर्षी आनंदीबाईचं गोपाळराव जोशी यांच्याशी लग्न झालं. आनंदीबाईंशी लग्न केलं तेव्हा गोपाळरावांनी त्यांच्या वडिलांनी एक अट घातली. 


मी आनंदीबाईंना माझ्या मनाप्रमाणे शिकवेन अशी अट घालून गोपाळरावांनी आनंदीबाईंशी लग्न केलं. शिक्षणात अडसर नको म्हणून त्यांनी कोल्हापूरात बदली करून घेतली. 


अशा आनंदीबाईंचा आणि गोपाळरावांचा प्रवास या सिनेमातून उलघडणार आहे. या सिनेमाकरता सगळेच प्रेक्षक उत्सुक आहेत. 


दिग्दर्शक समीर विद्वांस यांनी आतापर्यंत प्रेक्षकांना उत्तम कलाकृती दिली आहे. 'डबल सीट', 'टाईम प्लिज', 'YZ' सारखे सिनेमे आतापर्यंत दिग्दर्शित केले आहेत. 2019 मधील हा समीर विद्वांस यांचा खास प्रोजेक्ट आहे.