Zee Talkies Maharashtra cha Favourite Kon : मनोरंजन करण्यासाठी जे कलाकार त्यांच्या अभिनयाचा कस लावतात, पडद्यामागचे कलावंत कष्ट घेतात त्यांच्या कलेला पुरस्काराने गौरवणारा हा सोहळा असतो आणि सर्वात महत्वाचं म्हणजे रसिक प्रेक्षकांनी दिलेल्या मतांमधूनच 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?' हे ठरले जाते त्यामुळे या पुरस्कार सोहळ्याकडे कलाकार आणि रसिकांचं लक्ष लागलेलं असतं. मराठी मनोरंजन विश्वात अतिशय मानाचा समजला जाणारा 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण ?' हा पुरस्कार सोहळा,  यावर्षी पुन्हा एकदा झी टॉकीज वाहिनी आपल्या रसिक प्रेक्षकांच्या भेटीला लवकरच घेऊन येणार आहे. 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण ?'  या सोहळ्याची नामांकने 15 डिसेंबर मुंबई इथे जाहीर झाली. या नामांकन सोहळ्याचा  रंगतदार विशेष कार्यक्रमाची झलक लवकरचं  झी टॉकीजच्या सोशल मीडिया वर तसेच झी ५ या ऍप वर प्रेक्षकांना  लवकरचं पहायला मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुरस्काराआधीच उत्कंठा वाढवते ती या सोहळ्याच्या नामांकनाची यादी. 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?' या पुरस्कारासाठीच्या विविध विभागात नामांकन मिळालेल्या कलाकारांची नावं आता निश्चित झाली आहेत. झी टॉकीज वाहिनीच्या माध्यमातून 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण?' या  पुरस्कारासाठी नामांकन मिळालेल्या कलाकारांपैकी रसिकांची पसंती कुणाला मिळणार हे ठरवण्याची प्रक्रिया आता सुरू झाली आहे.  या स्पर्धेत जे प्रेक्षक आपली मते नोंदवतील त्यातील काही निवडक भाग्यवान प्रेक्षकांना त्यांच्या परिवारासह मुख्य इव्हेंट मध्ये  सहभागी होण्याची सुवर्ण  संधी झी टॉकीज देणार आहे. ह्या स्पर्धेचे नियम आणि अटी वोटिंग च्या लिंक वर उपलब्ध आहेत.



प्रेक्षक दोन पद्धतीने आपले मत नोंदवू शकतात . पहिली पद्धत म्हणजे , प्रेक्षक https://mfk.zee5.com/ या वेबसाइट वर जाऊन आपल्या आवडत्या कलाकारांना वोट करू शकतात . ह्या स्पर्धेचे नियम आणि  या वोटिंग च्या लिंक वर उपलब्ध आहेत .  त्याच बरोबर  ९१६०००१२१०  झी टॉकीज च्या ऑफिशियल व्हाटसऍप क्रमांकावर ‘वोट’ किंवा  ‘VOTE’ असे टाईप करून नामांकन पाहू शकतात आणि आपल्या आवडत्या कलाकारांना आपले मत देऊ शकतात. मत नोंदणी चा काळ संपल्यानंतर "महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? " हा मुख्य कार्यक्रम सोहळा  मुंबई मध्ये लवकरचं  होईल.



एकूण बारा विभागातून महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या पुरस्काराचे  मानकरी ठरणार आहे. प्रेक्षकांसोबतच या पुरस्कारावर किंवा नामांकन यादीत आपलं नाव यावं याचा आनंद कलाकारांनाही असतो, त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्राच्या रसिकांकडून मिळणारी पावती कलाकारांनाही सुखावणारी असते. त्यामुळे  महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण या सोहळ्यात  प्रेक्षक पसंतीची मोहर कोणत्या कलाकारावर उमटणार हे पहायला नक्कीच मजा येईल.


यामध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट , सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक, सर्वोत्कृष्ट अभिनेता, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री, सहाय्यक अभिनेता, सहाय्यक अभिनेत्री, सर्वोत्कृष्ट खलनायक, लोकप्रिय चेहरा , लोकप्रिय स्टाइल आयकॉन, सर्वोत्कृष्ट गीत, सर्वोत्कृष्ट गायक, सर्वोत्कृष्ट गायिका अश्या एकूण १२ विभागांचा समावेश आहे.सर्वोत्कृष्ट चित्रपटाच्या  नामांकन यादीत धर्मवीर, चंद्रमुखी, पांडू, दे धक्का २, टाइमपास ३, हर हर महादेव, शेरशिवराज आणि झोंबिवली या सिनेमांना स्थान मिळालं आहे. आता यातून महाराष्ट्राचा फेव्हरेट सिनेमा कोणता होणार याची उत्सुकता वाढली आहे. सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाच्या स्पर्धेत प्रवीण तरडे, प्रसाद ओक, विजू माने, महेश आणि सुदेश मांजरेकर, अभिजित देशपांडे, रवी जाधव, दिग्पाल लांजेकर आणि आदित्य सरपोतदार ही नावं आहेत. यामध्ये कोण बाजी मारणार हे लवकरच समोर येईल.



महाराष्ट्राचा फेव्हरेट अभिनेता कोण याकडे लक्ष लागलेल्या प्रेक्षकांसमोर अभिनेत्यांची नामांकन यादी आली आहे. यामध्ये प्रसाद ओक, आदिनाथ कोठारे, भाऊ कदम, मकरंद अनासपुरे, शरद केळक, प्रथमेश परब, ललित प्रभाकर आणि अमेय वाघ यांची नावं निश्चित झाली आहेत. तर सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या नामांकन यादीमध्ये अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, हृता दुर्गुळे, रितिका श्रोत्री आणि वैदेही परशुरामी यांचा समावेश आहे. सर्वात्कृष्ट खलनायक या विभागात प्राजक्ता माळी, विद्याधर जोशी, मिलिंद शिंदे, वैभव मांगले आणि मुकेश ऋषी यांची नावं नामांकन यादीत जाहीर झाली आहेत.



या १२ विभागातील नामांकित झालेल्या कलाकांरामधून आता "महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? " या पुरस्कारावर कोण नाव कोरणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. त्यासाठी झी टॉकीज वाहिनी सज्ज झाली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रेक्षकांनी या स्पर्धेत प्रत्येक विभागातून आपला महाराष्ट्राचा फेवरेट निवडावा आणि महाराष्ट्राचा फेवरेट कोण या कार्यक्रमाला सहकुटुंब उपस्थित राहण्याची संधी घ्यावी. प्रेक्षक आजपासून  https://mfk.zee5.com/ या वेबसाइट वर जाऊन किंवा ९१६०००१२१०  या झी टॉकीज च्या ऑफिसिअल व्हाटसऍप क्रमांकावर आपले मत नोंदवू शकतात.