महाराष्ट्र, २० ऑगस्ट २०२४ – मराठी चित्रपटप्रेमींसाठी खास आनंदाची बातमी! महाराष्ट्रातील सर्वात लोकप्रिय आणि नंबर १ ची  मराठी चित्रपट वाहिनी, झी टॉकीजने आपल्या 'टॉकीज कथायण चषक' स्पर्धेचा दुसरा अध्याय मोठ्या उत्साहात सुरू केला आहे.  'टॉकीज कथायण चषक'  हा  एक असा मंच आहे जिथे मराठीतील नवोदित पटकथा लेखकांना त्यांच्या कल्पनांना पंख लावण्याची अनोखी संधी मिळणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

२०२१ मध्ये झालेल्या 'टॉकीज कथायण चषक' च्या पहिल्या स्पर्धेला उदंड प्रतिसाद मिळाला होता आणि आता पुन्हा एकदा, अनेक नव्या लेखकांना आपल्या कथा मोठ्या पडद्यावर पाहण्याचं स्वप्न पूर्ण करण्याची सुवर्णसंधी झी टॉकीज वाहिनीमुळे मिळणार आहे.


'टॉकीज कथायण चषक'  ही स्पर्धा १८ वर्षांवरील प्रत्येकासाठी खुली आहे. या स्पर्धेत  कोणत्याही शैलीतील पटकथा स्वीकारल्या जातील, त्यामुळे लेखकांनो हीच ती संधी आहे तुमच्या कथा जगासमोर आणण्याची! तुमच्या कल्पनांना रुप देण्यासाठी हीच ती योग्य वेळ आहे. तुमच्या कथा ई-मेलद्वारे  talkieskathayan@zee.com यावर पाठवा आणि स्पर्धेच्या नियम व अटींसाठी या लिंकवर क्लिक करा https://zeetalkieskathayan.zee5.com/tnc.html.


'टॉकीज कथायण चषक' ही स्पर्धा १८ ऑगस्ट २०२४ रोजी सुरु होत असून  आणि  कथा पाठवण्याची अंतिम तारीख १५ ऑक्टोबर २०२४ आहे. विजेत्यांची घोषणा जानेवारी २०२५ मध्ये 'महाराष्ट्राचा फेव्हरेट कोण? २०२४' या प्रतिष्ठित पुरस्कार सोहळ्यात केली जाईल. विजेत्याला झी टॉकीज आणि झी स्टुडिओज मध्ये पटकथा लेखक म्हणून काम करण्याची संधी मिळणार आहे आणि सोबतच रोख बक्षीसही मिळेल. ही संधी म्हणजे मराठीतील प्रत्येक प्रतिभावान लेखकासाठी एक स्वप्नपूर्तीच आहे.


श्री. बवेश जानवलेकर , बिझिनेस हेड - झी टॉकीज , झी युवा आणि झी चित्रमंदिर आणि बिझिनेस हेड - झी स्टुडिओज मराठी यांनी सांगितले , "महाराष्ट्राच्या प्रत्येक कानाकोपऱ्यातील प्रतिभावान लेखकांना संधी देणं हे आमचं ध्येय आहे. त्यांच्या कथा जगासमोर आणून त्यांना मोठं व्यासपीठ मिळवून देणं हे आमचं उद्दिष्ट आहे. झी टॉकीजच्या 'टॉकीज कथायण चषक' उपक्रमांतून आम्ही या नव्या लेखकांना त्यांच्या गोष्टी चित्रपटांत रूपांतरित करण्याची संधी देत आहोत."


नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी प्रसिद्ध असलेल्या झी टॉकीजने 'टॉकीज ओरिजिनल' या उपक्रमांतर्गत आजवर ८ मराठी चित्रपटांची निर्मिती केली आहे, जे थेट टेलिव्हिजनवर प्रदर्शित करण्यात आले  आहेत. 'टॉकीज कथायण चषक' ही स्पर्धा झी टॉकीजच्या माध्यमातून सुरु करण्यात आली आहे, जेणेकरून महाराष्ट्रभरातील प्रत्येक प्रतिभावान लेखक आपल्या कथेच्या जादूने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करू शकतील. अश्या मराठी मातीतल्या कथांसाठीची हि स्पर्धा आहे. या स्पर्धेतून लाखो कथा समोर येतील आणि निवडलेल्या कथांना झी टॉकीज आणि झी स्टुडिओजच्या चित्रपटांद्वारे रुपेरी पडद्यावर येण्याची संधी मिळेल.


तर लेखकांनो तुमचं स्वप्न साकार करण्यासाठी सज्ज आहात? मग झी टॉकीजच्या 'टॉकीज कथायण चषक' स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आणि अधिक माहितीसाठी, https://zeetalkieskathayan.zee5.com/tnc.html या लिंकला भेट द्या. कारण आता तुमची कला जगासमोर आणण्याची वेळ आली आहे!