मुंबई : 'डॉक्टर डॉन', 'लाव रे तो व्हिडिओ', 'प्रेम पॉयजन पंगा', 'ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण' हे झी युवावरचे सध्याचे लोकप्रिय कार्यक्रम. प्रेक्षकांच्या पसंतीची पोचपावती या कार्यक्रमांना भरघोस मिळतेय. विशेष म्हणजे ही आवड या मालिकांना वाढलेल्या प्रेक्षकसंख्येतून दिसून येतेच आहे पण त्याबरोबरच चाहते आता विविध मार्गाने आपले हे प्रेम किंवा क्रेझ कलाकारांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतायत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विश्वास बसत नाहीये ना..? मुंबईतल्या संदेश नागांवकर यांचं उदाहरणच बघा ना. झी युवावरच्या या मालिकांचे आणि यातल्या कलाकारांचे संदेश डायहार्ड फॅन आहेत आणि त्यांनी आता त्यांच्या या आवडत्या कलाकारांची आणि व्यक्तिरेखांची छायाचित्रं असलेले मास्क आता चक्क बाजारामध्ये विक्रीसाठी आणलेत. ज्यात या लोकप्रिय व्यक्तिरेखांची छायाचित्रे तुम्हाला पहायला मिळतातच सोबत त्यांचे आवडते डायलॉग्ज, पंचलाईन्स किंवा वनलाईनर्स पण वाचायला मिळतात.


मग ते डॉक्टर डॉन मालिकेतला डॅशिंग डॉन देवा असो किंवा डॉक्टर मोनिका असो, प्रेम पॉयजन पंगा मधले आपल्या सर्वांचे लाडके जुई आलाप असो किंवा ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण मालिकेमधली सई आणि नचिकेतची गोड जोडी असो किंवा घरातले आदरणीय अप्पा केतकर असोत.


मुंबईमध्ये सध्या संदेश नागांवकर यांच्या दुकानामध्ये हे आकर्षक मास्क सध्या विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आलेत. सध्या कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामध्ये मास्कचे महत्व आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये किती अनन्य साधारण आहे हे वेगळे सांगायला नको.



यात आता संदेशजींसारखे सामाजिक जाणिवा जपणारे प्रेक्षक जेव्हा अशा पद्धतीचे उपक्रम राबवतात तेव्हा मनोरंजन आणि सामाजिक जबाबदारी यांची सुंदर सांगड जूळून येते. एकूण काय तर या मास्कमुळे चाहत्यांना सामाजिक जबाबदारीही निभवता येईल आणि आपल्या लाडक्या कलाकारांना सोबत घेऊन मिरवताही येईल.