मुंबई :  आपण देवावर किती प्रेम करतो या पेक्षा देव आपल्यावर किती प्रेम करतो आणि मुख्य म्हणजे आजकालच्या चुकीच्या रूढी परंपरांचा बागुलबुवा न करता काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखवण्यासाठी देवाला सुद्धा मनुष्यरूपातमानवाला त्याचा एक मित्र म्हणून भेटण्याची गरज निर्माण होत आहे, हे दाखवण्याचा एक स्तुत्य प्रयत्न झी युवा वाहिनीने देवाशप्पथ या मालिकेतून केला आहे. क्रिश म्हणजे कृष्ण हा देव त्याच्या श्लोक या भक्ताला भेटायला पृथ्वीतलावर आला आहे. पण हा श्लोक मात्र देवाला मानतच नाही आणि त्या दोघांची जुगलबंदी प्रेक्षक मालिकेत अनुभवतात. नुकतंच मालिकेत श्लोक आणि कुहू लग्नाच्या बेडीत अडकले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्लोक आणि कुहू यांचे लग्न झाले असले तरी त्यांच्या कुटुंबियांना ते मान्य नाही आहे. त्यांच्या लग्नाच्या निर्णयावर सर्व जण नाराजीदेखील व्यक्त करतात आणि म्हणून श्लोक आणि कुहू क्रिशच्या घरी राहण्याचे ठरवतात. काहीदिवसांनंतर, श्लोकची आई त्या दोघांना घरी परत बोलावण्यासाठी येते. श्लोक आणि कुहू घरी परत जाण्यास नकार देतात पण त्याची आई त्यांची समजूत काढते आणि ते दोघे तिच्या सोबत घरी परत जातात. घरी आल्यानंतर,श्लोकची आई त्या दोघांचे औक्षण करून स्वागत करते आणि लगेच तिथून निघून जाते. त्यामुळे चकित झालेला श्लोक तिला काय झाले असे विचारतो. तेव्हा ती त्याला सांगते की तिच्या मुलाला आणि सुनेला घरी आणणे तिचे कर्तव्यहोते आणि ते तिने पार पाडले आहे पण तरीही कुहूला सून म्हणून घरात स्विकारलेले नाही. तसेच कुहू स्वयंपाकघरातील पहिला पदार्थ म्हणून खीर बनवणार आहे. क्रिश ती खीर आकाशला नेऊन देतो आणि त्याला मनवण्याचा प्रयत्नकरतो जेणेकरून त्याने श्लोक आणि कुहूला माफ करावे.  
  
कुहू तिच्या पाककौशल्याने सर्वांच्या मनात जागा बनवू शकेल का? आकाश श्लोक आणि कुहूला माफ करेल का? जाणून घेण्यासाठी पहा देवाशप्पथ, प्रत्येक सोमवार ते शनिवार संध्याकाळी ७ वाजता फक्त झी युवा वर!