मुंबई : आपण देवावर किती प्रेम करतो या पेक्षा देव आपल्यावर किती प्रेम करतो आणि मुख्य म्हणजे आजकालच्या चुकीच्या रूढी परंपरांचा बागुलबुवा करता काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखवण्यासाठी देवाला सुद्धा मनुष्यरूपात मानवाला त्याचा एक मित्र म्हणून भेटण्याची गरज निर्माण होत आहेहे दाखवण्याचा एक स्तुत्य प्रयत्न झी युवा वाहिनीने देवाशप्पथ या मालिकेतून केला आहे. क्रिश म्हणजे कृष्ण हा देव त्याच्या श्लोक या भक्ताला भेटायला पृथ्वी तलावर आला आहे. पण हा श्लोक मात्र देवाला मानतच नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

नास्तिक असलेल्या श्लोकचे पात्र साकारले आहे संकर्षण कऱ्हाडेनेजो मालिकेत एक आदर्शशिस्तबद्ध स्पष्टवक्ता आणि व्यवहारी व्यक्ती आहे. जे पाहिल त्यावरच विश्वास ठेवणारा आहे. परंतुसंकर्षण हा त्याच्या वास्तविक जीवनात अगदी वेगळा आहे. संकर्षण खऱ्या आयुष्यात खूप बोलका आणि हसमुख व्यक्ती आहे. तो सेट वरती देखील सर्वांना हसवतो. त्याच्या सोशल मीडिया अकाउंट्स वरून देखील त्याच व्यक्तिमत्व हे खूप खेळकर असल्याचं दिसून येतंसेटवरील सर्वजण म्हणतात की तो असला की सेटवर कधीच कोणी कंटाळत नाही. मालिकेतील त्याच्या वास्तविक जीवनापेक्षा वेगळी भूमिका सहजगत्या साकारणे हे आश्चर्य़कारक आहे.


याबद्दल बोलताना संकर्षण म्हणाला "माझ्या व्यक्तिमत्वा पेक्षा वेगळी भूमिका साकारणे हे गमतीशीर आहेश्लोकचे पात्र अतिशय शांत आणि शिस्तबद्ध आहे जे माझ्या व्यक्तिमत्वापेक्षा पूर्णपणे वेगळे आहेत्यामुळे हे पात्र साकारणे अतिशय मजेदार वाटत आहे आणि त्याच बरोबर आव्हानात्मक सुध्दा आहे."