`घरातून पळून गेले अन् आईला दुखावलं`; `त्या` वेदनादायी आठवणींनी गहिवरल्या झीनत अमान
Zeenat Aman : झीनत अमान यांनी नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत आईला कसं दुखावलं याविषयी सांगितलं आहे.
Zeenat Aman : बॉलिवूड अभिनेत्री झीनत अमान या त्यांच्या काळातील लोकप्रिय कलाकारांपैकी एक आहे. झीनत अमान या त्यांच्या सोशल मीडियावर नेहमीच पोस्ट शेअर करताना दिसतात. त्यांच्या पोस्टमधून नेहमीच वेगवेगळ्या गोष्टींचे खुलासा करताना दिसतात. झीनत यांनी त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर करत त्यांनी जेव्हा अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला तेव्हा त्यांच्या आईनं नोकरी सोडली याचा खुलासा केला आहे. त्याशिवाय झीनत यांनी घेतलेल्या एका निर्णयामुळे त्यांच्या आईला खूप मोठा धक्का बसल्याचे देखील त्यांनी सांगितले.
झीनत यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून आई वर्धिनी शारवाचर वडील अमानुल्लाह खान आणि त्यांचे सावत्र वडील यांचे फोटो शेअर केले. त्यांच्या आईची आठवण काढत झीनत यांनी लिहिले की त्यांच्या आईशिवाय अशी कोणतीच स्त्री त्यांना भेटली नाही जी इतकी विलक्षण असेल. आईचे फोटो शेअर करत झीनत यांनी कॅप्शन दिलं की "दर रविवारी, एक डेडीकेटेड शुभचिंतक, त्याच्या आर्काइव्समधून मला माझे जूने फोटो पाठवतो. तुम्ही त्याला झीनत अमानच्या आठवणी म्हणू शकता. या रविवारी त्यानं मला माझ्या आईचे दोन फोटो पाठवले. ज्यात ती माझे वडील अमानुल्लाह खान आणि माझे जर्मनचे स्टेपफादर (सावत्र वडील) अंकल हाईन्जसोबत दिसते. माझ्या आयुष्यातली माझ्या आईशिवाय विलक्षण अशी कोणतीही महिला नव्हती. माझं सेफटीचं ते ठिकाण होतं. ज्या काळात ती होती त्याच्या पलिकडेचे तिचे विचार होते. ती सभ्य, सुंदर आणि अतिशय हुशार होती."
झीनत यांनी सांगितलं की "जेव्हा मी अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला. तेव्हा आईनं माझी मॅनेजर होण्यासाठी तिची नोकरी सोडली. ती माझे कॉन्ट्रॅक्ट नेगोशिएट करायची, मला मिळणारं मानधन सांभाळायची. माझा डब्बा तयार करायची, मला डायलॉग्स शिकवायची, माझ्या स्टाईलला इन्स्पायर करायची आणि माझा कॉन्फिडेंट खूप वाढवायची. त्याशिवाय मुंबईत तिची सुंदर अशी लाइफस्टाइल देखील मेन्टेन करत सगळं काही करायची."
हेही वाचा : गौरव मोरेच्या 'या' कृत्याची जुही चावला झाली फॅन!
झीनत यांनी पुढे त्यांच्या एका निर्णयामुळे त्यांच्या आईला खूप वाईट वाटलं याविषयी सांगितलंय. "आईला कधीच कोणता पुरुष हा माझ्यासाठी योग्य आहे असं वाटलं नाही आणि फक्त या एका मुद्यावरून आमच्यात वाद व्हायचे. पण जेव्हाही मला वाटायचं, तेव्हा मी आमच्या नेपियन सी रोडच्या इथे असलेल्या घरात तिच्या अंथरुणात जाऊन झोपायचे. तिच्या शेजारी लोळून मी तिचा हाथ पकडायचे. आम्ही दोघं काही बोलायचो नाही, पण आमच्यातला वाद हा तिथेच संपायचा आणि मला सुरक्षित वाटू लागायचं. घरातून पळून जाऊन मी माझ्या आईनं मन दुखावलं हे तितकंच सत्य आहे. पण माझ्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर, ज्याचा वाढदिवस तिच्यासोबतच असतो, तेव्हा सगळं ठीक झालं. 1995 मध्ये जेव्हा आईचं निधन झालं तेव्हा असं वाटलं की माझ्या खांद्यावरून माझी सुरक्षा करणारं एक कवच माझ्यापासून दूर झालं आहे. आईचे हे फोटो आता माझ्यासाठी आणखी महत्त्वाची ठरली आहेत कारण आता मी माझ्या सुरक्षित ठिकाणी, फक्त माझ्या आठवणींच्या मदतीनंच जाऊ शकते." झीनत यांच्या कामाविषयी बोलायचे झाले तर त्या लवकरच 'बन टिक्की' आणि 'मार्गो फाइल्स' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.