मुंबई : अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या 'टायगर जिंदा है' या चित्रपटाचे अजून एक गाणं रसिकांच्या भेटीला आलं आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'स्वॅग से स्वागत' या चित्रपटामध्ये सलमानचा 'कूल' अंदाज आपण पाहिला. त्यानंतर 'दिल दिया गल्ला' गाण्यामध्ये तुम्ही सलमान कॅटरिनामधील रोमॅंटिक अंदाज  पाहिलात पण सिनेमाच्या थीमला चपखल बसणारा आणि चित्रपटाची जान असलेली 'अ‍ॅक्शन' तुम्हांला पहायची असेल तर तर हे नवं गाणं पहायलाच हवे.  


'जिंदा है'  गाणं  


चित्रपटातील पहिल्या दोन गाण्यांप्रमाणेच तिसरे गाणेदेखील दमदार आहे. 'झोया आणि टायगर' यांच्यामधील केमेस्ट्री आणि संघर्षाची या गाण्यामध्ये झलक आहे. 


येत्या २२ डिसेंबरला चित्रपट रिलीज होणार आहे. त्यापूर्वी तीन दिवस नवं गाणं रसिकांच्या भेटीला आल्याने चाहत्यांमध्ये उत्साह आला आहे.  'टायगर जिंदा है' चित्रपटाचे अ‍ॅडव्हान्स आणि ऑनलाईन बुकिंगदेखील अनेक ठिकाणी हाऊसफुल्ल झाले आहे. त्यामुळे आता येत्या शुक्रवारी हा चित्रपट बॉक्सऑफिसवर दमदार कामगिरी करणार असल्याचं चित्र स्पष्ट झालं आहे.   



नवे प्रोजेक्ट 


सध्या बिग बॉस 11 चं सूत्रसंचालन सलमान खान करत आहे. 'टायगर जिंदा है' या चित्रपटानंतर 'दबंग ३' आणि 'रेस ३' या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये आहे. मागील ईदला सलमान खानच्या 'ट्युबलाईट' या चित्रपटाने प्रेक्षकांना नाराज केले होते. त्यानंतर आता येणारा ' टायगर..' सलमानच्या चाहत्यांना ख्रिस्मसला ट्रिट देणार आहे.