बॉयलरचा स्फोट, धुराचे लोट आणि 2 ते 3 किलोमीटरपर्यंत हादरे...डोंबिवलीतील आगीचे भीषण फोटो

Dombivli MIDC Blast Photos: स्फोटानं डोंबिवली एमआयडीसी हादरलीये. एमआयडीसीमधील एका कंपनीमध्ये बॉयलरचा स्फोट झालाय. स्फोटामध्ये काही कामगार आणि नागरिक जखमी झालेत. तर 200 मीटर परिसरातील घरांच्या काचा फुटल्याचीही माहिती मिळतेय. त्याचबरोबर जवळपासच्या कंपन्यांमध्येही आग लागल्याचं समजतंय. या स्फोटामुळे परिसरात भीतीचं वातावरण आहे.

| May 23, 2024, 18:11 PM IST
1/7

डोंबिवली एमआयडीसीमधील फेज 2 मधील अमुदान केमिकल कंपनीत गुरुवारी दुपारी बॉयलरचा भीषण स्फोट झाला. काही वेळातच आगीने भीषण रुप धारण केलं. आकाशात उठत असलेले काळ्या धुराचे प्रचंड लोट स्पष्टपणे दिसत आहेत. 

2/7

आगीची तीव्रता पाहाता उल्हासनगर, अंबरनाथ, ठाणे येथून अग्नीशमन दलाच्या गाड्या बोलवण्यात आल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आगीत सहाते सात कामगार जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

3/7

केमिकल कंपनीला लागलेली ही आग इतर ठिकाणी पसरल्याने तीव्रता वाढीलय.. या स्फोटामुळे कंपनी शेजारी असलेल्या इमारतीच्या कामचा फुटल्या आहेत. आगीची लोळ दोन किलोमीटर लांबून दिसत आहे. स्फोट झाल्यानंतर अनेक वस्तू हवेत उडाल्या.

4/7

या स्फोटाचे नेमके कारण आणि तीव्रता अद्याप समजू शकलेली नाही. मात्र, डोंबिवली एमआयडीसीपासून (Dombivli MIDC) लांबच्या अंतरावर असलेल्या परिसरातूनही आकाशात उठत असलेले काळ्या धुराचे प्रचंड लोट स्पष्टपणे दिसत आहेत. 

5/7

हा स्फोट झाल्यानंतर डोंबिवली परिसरातील अनेक किलोमीटरपर्यंत या स्फोटाचे हादरे जाणवले. त्यामुळे या परिसरातील अनेक इमारतींच्या काचा फुटल्या आहे.  अग्निशमन दलाकडून अतिरिक्त कुमक मागवून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न  सुरु आहेत.

6/7

कंपनीत ठेवलेल्या केमिकल ड्रमचे स्फोट होत आहेत, अशी माहिती डोंबिवलीतील माजी नगरसेवक मंदार हळबे यांनी दिली. घटनास्थळी अग्निशमन दल आणि डॉक्टरांचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे.

7/7

अग्निशमन दलाकडून अतिरिक्त कुमक मागवून आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत. आग भीषण असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना आतमध्ये जाणे अद्याप शक्य झालेले नाही.