मुंबई : सोशल मीडियावर स्टार किड्समध्ये शाहरूखच्या मुलीला अधिक पसंती आहे. सुहानाचे अनेक फॉलोअर्स आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळतात. सुहानाची सोशल मीडियावर भरपूर चर्चा आहे. चाहते वाट पाहत आहेत की, किंग खानप्रमाणे सुहाना कधी पडद्यावर दिसणार? यावर शाहरूख खानने कायम गोपनियता ठेवली. मात्र आता चाहत्यांची प्रतीक्षा संपणार आहे. सुहाना लवकरचं बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुहानाला बॉलिवूडमध्ये दिग्दर्शक करण जोहर नाही तर फिल्ममेकर झोया अख्तर लाँच करणार असल्याची चर्चा रंगत आहे. करण जोहर सुहानाला बॉलिवूडमध्ये लाँच करेल अशी चर्चा होती पण आता ही जबाबदारी झोयाने तिच्या खांद्यावर घेतली आहे. 


सुहानाला नुकताचं झोया अख्तरच्या ऑफिसबाहेर  स्पॉट करण्यात आलं. त्यामुळे सुहाना लवकरचं रूपेरी पडद्यावर झळकेल अशी शक्यता नाकारता येत नाही. झोया अख्तर इंटरनॅशनल कॉमिक बूक आर्चीवर एक प्रोजेक्ट तयार करण्याच्या तयारीत आहे. 



झोयाचा नवा प्रोजेक्ट ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्स प्रदर्शित करण्यात येणार आहे. यासाठी सुहाना खानचं नाव फायनल करण्यात आलं असल्याचं सांगण्यात येत आहे. सुहाना शिवाय या प्रोजेक्टमध्ये खुशी कपूर आणि महानायक अमिताभ बच्चन यांचा नातू  अगस्त्य नंदा देखील दिसणार आहे. 


पण अद्याप याबद्दल कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.  सांगायचं झालं तर अभिनेत्री होण्याचं सुहानाचं स्वप्न लहानपणापासून होतं. तर शाहरूखचा मुलगा आर्यन खान अभिनेता म्हणून नाही तर एक फिल्ममेकर होण्याचे स्वप्न पाहात आहे.