एकेकाळी सायकलसाठीही नव्हते पैसै आज आहेत Jet airwaysचे फाऊंडर
विमानसेवा पुरवणारी जेट एअरवेज ही कंपनी तर तुम्हाला माहितच असेल. पण, या कंपनीच्या संस्थापकाबद्धल कदाचित खूपच कमी लोकांना माहिती असेल. नरेश गोयल हे या कंपनीचे चेअरमन. जे एक सक्सेस व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. एकेकाळी सायकल खरेदी खरण्यासाठीही पैसे नसलेला हा माणूस आज एका विमान कंपनीचा मालक आहे. जाणून घेऊया या व्यक्तिमत्वाबद्धल...
नवी दिल्ली : विमानसेवा पुरवणारी जेट एअरवेज ही कंपनी तर तुम्हाला माहितच असेल. पण, या कंपनीच्या संस्थापकाबद्धल कदाचित खूपच कमी लोकांना माहिती असेल. नरेश गोयल हे या कंपनीचे चेअरमन. जे एक सक्सेस व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाते. एकेकाळी सायकल खरेदी खरण्यासाठीही पैसे नसलेला हा माणूस आज एका विमान कंपनीचा मालक आहे. जाणून घेऊया या व्यक्तिमत्वाबद्धल...
नरेश गोयल यांची कहाणी सुरू होते पंजाबमधील संगरूर इथून. संगरूर येथे २९ जुलै १९४९ मध्ये नरेश गोयल यांचा जन्म झाला. एका दागिणे व्यापाऱ्याच्या पोटी जन्म घेतलेल्या नरेश यांच्या बालपणाचा सुरूवातीचा काळ चांगला गेला. पण, त्यांच्यासाठी हा काळ फार दिवस टिकला नाही. वयाच्या ११ व्या वर्षी त्यांच्या वडिलांचे निधन झाले. वडीलांच्या जाण्यानंतर घरात गरीबी आली. घरावर कर्जाचा डोंगर साचला. सर्व वस्तू विकल्या गेल्या. अगदी रहायलाही घर राहिले नाही. त्यामुळे त्यांनी आपल्या कुटूंबियांसोबत आपला मुक्काम निनिहालला हालवला. तिथेही गरीबीने त्यांची पाठ सोडली नाही.
राहण्याचे ठिकाण बदललने म्हणून घरची स्थिती बदलली नाही. घरातून शाळेपर्यंत जाण्यासाठीही त्यांच्याकडे पैसे नसत. त्यामुळे गोयल यांना शिक्षणासाठी अनेक मैल पायी चालत जावे लागे. सोबतची मुले सायकलवरून शाळेला जात. पण, सायकल घेण्याइतकेही त्यांच्या आईकडे पैसे नसत. शाळेला जात असताना आपण चार्टर्ड अकाऊंटंटचे शिक्षण घ्यावे आणि पटकन नोकरीला लागावे असे त्यांना वाटत असे. त्यासाठी त्यांनी एका कॉलेजमधून बीकॉमपर्यंतचे शिक्षण घेतले.
१९६७मध्ये ग्रॅज्यूएशन पूर्ण केल्यानंतर नरेश यांनी आपल्या मामाच्या ट्राव्हल एजन्सीत काम करणे सुरू केले. त्या कंपनीत ते लेबनीज एयरलाइन्ससाठी काम करत होते. या कामाचे त्यांना १० रूपये मिळत असत. महिन्याचे एकूण ३०० रूपये व्हायचे. साधारण ७ वर्षांपर्यंत हा प्रवास राहिला. ७ वर्षांनतर त्यांनी नरेश यांनी स्वतंत्र व्यवसाय सुरू केला. पण, त्यांनी पुन्हा मोठ्या कंपन्यांसोबत चांगल्या पदांवर नोकरी करण्यासाठी सुरूवात केली. यात त्यांना इराक एअरवेजसाठी पीआर म्हणून काम करण्याची संधी मिळाली. तसेच, त्यांनी रॉयल जॉर्डियन एअरलाइनसाठी रीजनल मैनेजर, मिडल ईस्टर्न एअरलाइन्स कंपन्यांसाठी भारतीय कार्यालयातून तिकीट, रिजर्व्हेशन, सेल्स अशा अनेक पदांवर काम केले.
या मोठ्या विमान कंपन्यांसोबत काम करताना त्यांन लोकांच्या आडचणी लक्षात आल्या. मग त्यांनी या अडचणी सोडविण्यासाठी स्वत:च विमानकंपनी सुरू करण्याचा निर्णय घेतला. कंपनी सुरू केल्यावर सुरूवातीला त्यांना फार यश आले नाही. म्हटले तर, तोटाच अधीक झाला. पण, अल्पावधीतच कंपनीची प्रगती सुरू झाली. आज जेट एअरवेजमुळे नरेश गोयल भारतातील २० श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून ओळखले जातात.