डेबोलिन सेन, मुंबई : 3 डिसेंबर रोजी जागतिक दिव्यांग दिन होक आहे, त्यानिमित्ताने आढावा घ्यायचा झाल्यास, दिव्यांगाना भारतात जास्तीत जास्त सुलभ प्रकारे वावरता यावे, यासाठी विविध उपक्रमांचे योगदान मिळणे गरजेचे आहे. दिव्यांगासाठी पर्यटनाचे अनेबल ट्रॅव्हल, हे ठोस व पहिले व्यासपीठ भारतात साकरणारे तज्ज्ञ देबोलिन सेन यांनी हा लेख लिहिला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दिव्यांदांच्या हक्कांसाठी लढणाऱ्या कार्यकर्त्या आणि स्वतः दिव्यांग असलेल्या विराली मोदी यांनी मुंबईतील सर्वोत्तम 20पेक्षा जास्त रेस्टॉरंट्सना गेल्याच महिन्यात भेट दिली, यापैकी केवळ 5 रेस्टॉरंट्समध्ये त्यांना व्हिलचेअर वापरणाऱ्यांसाठी सुयोग्य असे रॅम्प आढळली, या रॅम्पच्या साहाय्याने कुठल्याही साहाय्याशिवाय दिव्यांग व्यक्तींना रेस्टॉरंटमध्ये जाता येईल. यातून हेच दिसून येते, की मुंबईत दिव्यांगांबद्दल जागरुकतेचा फारच अभाव आहे. मुंबईसारख्या शहरामध्ये ही परिस्थिती असेल, तर बाकीच्या शहारांमध्येही फार काही वेगळं पाहायला मिळणार नाही. भारतातील लोकं दिव्यांग व्यक्तींना पाहिल्यावर अनुकंपा वाटून तातडीने मदतीला धावतातही, परंतु दिव्यांग व्यक्तींच्या स्वतंत्र वावरासाठी ते पुरसं नाही. भारतातील रेल्वे स्थानके, बस, विमानतळ, थिएटर, हॉटेल, सार्वजनिक प्रसाधनगृहे यासारख्या ठिकाणी अधिक सोयी-सुविधा निर्माण करण्याची गरज आहे, यामुळे देशातील कुठल्याही शहरात दिव्यांग स्वतंत्रपणे वावरू शकतील.


2011 सालच्या भारताच्या जनगणनेनुसार, भारतातील लोकसंख्येच्या 20.3 टक्के लोकं व्हीलचेअरशी बांधलेली आहेत, 18.8 लोकं दृष्टीहीन आहेत, 18.9 टक्के लोकं श्रवणदोष असलेली आहेत आणि 7.5 टक्के लोकं मुकी आहेत. अर्थात, या भारतीयांसाठी प्रवास म्हणजे एक दिव्य गोष्ट होऊन बसते, हे अतिशय दुर्दैवी आहे, त्यांच्या प्रवासातील गरजा लक्षात घेणे गरजेचे आहे आणि एकूण लोकसंख्येच्या 2.2 टक्के लोकं अपंगत्वासह तरीही मह्त्त्वाकांक्षा बाळगून आहेत.


दिव्यांगांसाठी प्रवास या पर्यटनविषयक व्यासपीठाशी विराली जोडलेल्या आहेत, त्यांच्या #रॅम्प माय रेस्टॉरंट कॅम्पेनला ऑनलाइन याचिकेद्वारे जोरदार सुरुवात झाली, नॅशनल रेस्टॉरंट असोसिएशन ऑफ इंडिया, पर्यटन मंत्रालय आणि सामाजिक कल्याण मंत्रालय त्याची नक्की दखल घेतील, अशी आशा त्यांना आहे. यापूर्वी रेल्वेमध्ये फोल्डेबल व्हिलचेअर असाव्यात आणि स्थानकांवर दिव्यांगांसाठी रॅम्प असावेत यासाठी यशस्वीपणे आपली बाजू मांडली होती. भारत हळूहळू दिव्यांगांना सुलभ होतील, अशा सोयी-सुविधा साकारत आहे, विरालीसारख्या अनेक कार्यकर्त्यांनी घेतलेल्या परिश्रमांमुळे हे शक्य होत आहे, त्यासाठी त्यांचे धन्यवादच मानायला हवेत, विशेष गरजा ओळखून त्यानुसार इतरांसारखेच आयुष्य सोपे व सुलभ व्हावे यासाठी त्या प्रयत्न करत आहे. परंतु हा प्रवास अजिबातच सोपा नाहीये.


अनेबल ट्रॅव्हलद्वारे भारतभरातील दिव्यांग प्रवाशांसाठीच्या गरजांचा अभ्यास करण्यात आला, यात 100पेक्षा जास्त दिव्यांग व्यक्ती सहभागी झाल्या होत्या, यात दिव्यांग व्यक्तींनाही भरपूर प्रवास करायचा असून, विविध ठिकाणांचा अनुभव घेण्याची त्यांची इच्छा असल्याचे या अभ्यासाअंती दिसून आले आहे. असे असले, तरीही विविध अडचणींमुळे त्यांना प्रवास करता येत नाही, आणि प्रवास केल्यास तो फारसा आनंददायक असत नाही. यात माहिती आणि पाठिंब्याची उपलब्धता, दिव्यांग व्यक्तींसाठी मर्यादित हॉटेल रुम्स, सुयोग्य वाहतुकीचा अभाव, जिम, स्पा आणि स्विमिंग पूलसारख्या गोष्टींचा वापर करण्यास मर्यादा, प्रवासादरम्यानच्या ठिकाणी विविध ठिकाणे आणि टॉयलेटच्या बांधणीचा अभाव यासारख्या अडचणींचा यात समावेश होतो. या अभ्यासात असेही नमूद करण्यात आले आहे, की यात सहभागी झालेल्यांपैकी 90 टक्के व्हिलचेअरवरील व्यक्तींना रेस्टॉरंटमधील जिन्यांना प्राधान्य देता येत नाही, तर 100 टक्के श्रवणदोष असलेल्या व्यक्ती व्हिज्युअल अलर्ट डिव्हाइस असलेल्या हॉटेलांनाच प्राधान्य देतात, तर 90 दृष्टीहिनांना मूलतः पूर्वनियोजित ट्रीपलाच प्राधान्य द्यावे लागते.


दिव्यांग व्यक्तींना जीवन जगण्यासाठी समान संधी उपलब्ध होणे, हा त्यांचा हक्कच आहे. या संधी घेण्यासाठी प्रवास करण्याची सक्षमता त्यांना मिळायला हवी. अनेबल ट्रॅव्हलसारख्या माध्यमातून कुठल्याही अडथळ्यांविना आणि दिव्यांगांचा विचार करूनच प्रवासाचे नियोजन करण्यात येते. सध्याच्या घडीला अनेबल ट्रॅव्हल सेवा व्हिलचेअर वापरणाऱ्यांना, दृष्टीहिनांना, मूकबधिरांना दिली जाते, यामुळे त्यांना प्रवासाचे स्वांतत्र्य, विविध पर्याय आणि समान प्रवास करता येतो. अनेबल ट्रॅव्हलद्वारे तज्ज्ञांच्या मंडळाने, जे स्वतः दिव्यांग व्यक्ती आहेत, त्यांनी ही सेवा विकसित करण्यात महत्त्वाचा वाटा उचलला आहे. याशिवाय, अनेबल ट्रॅव्हलमध्ये यशस्वी व्यक्तिमत्त्वांचाही समावेश आहे, यात भारताच्या दिव्यांग जगातील व्यक्ती आहेत, या व्यक्तींनी दिव्यांग समाजासाठी कुठल्याही अडथळ्यांविना प्रवास करणे, अनुभव घेणे आणि पर्यटन असा मार्ग खुला केला आहे.


अनेबल ट्रॅव्हलसारख्या उपक्रमातून प्रशासनानेही `अॅक्सेसेबल इंडिया' कँपेन चालवली आहे, यामध्ये पर्यटकांसाठी उपयुक्त अशी ठिकाणे दिव्यांसांसाठी पूर्णपणे उपलब्ध करून देण्यात आली आहेत. बहुतांश पाच तारांकित हॉटेले, मुख्य शहरातील नवीन विमानतळ आता दिव्यांग व्यक्तींसाठी सानुकूल बनवण्यात आली आहेत. गोवा, महाराष्ट्रातील अजिंठा-वेरुळ गुंफा, आग्र्याचा ताजमहल, दिल्लीचा कुतूबमिनार यासारखी पर्यटनस्थळे यापूर्वीच दिव्यांग व्यक्तींसाठी सानुकूल करण्यात आली आहेत. यासारख्या अनेक ठिकाणी हाच उपक्रम राबवण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.


हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात, विशेषतः पाच तारांकित हॉटेल चेन आणि काही चार तारांकित ठिकाणी या प्रश्नासाठी विशेष सेवा सुरू करण्यात आली आहे. याशिवाय दिव्यांग व्यक्तींसाठी उपयुक्त अशा सेवा करण्यात भागधारकांनीही योगदान दिले आहे. हॉटेलांनी वेबसाइटमध्ये रूम्स आणि बाथरूम योग्य प्रकारे दर्शवल्या आणि ग्राहकांच्या उपलब्धेविषयक प्रश्नांची समाधानकारक उत्तरे हॉटेल कर्मचाऱ्यांनी दिली तर फार मोठ्या प्रमाणात हा प्रश्न सुटू शकेल. दिव्यांग व्यक्तींना वापरता येईल असे स्लाइडिंग दरवाज्यांचे बाथरूम आणि व्हिलचेअरवरील व्यक्तींना वावरता येईल इतकी रुममध्ये जागा ठेवणे गरजेचे आहे. याशिवाय दृष्टीहीनांसाठी ब्रेल लिपीतील पॅम्पलेटही छापणे आवश्यक आहे.


प्रवास सर्वच ठिकाणी शक्य व्हावा यासाठी टूर ऑपरेटर, विमान कर्मचारी, विमानतळ, स्थलदर्शन, हॉटेलं, रेस्टॉरंट, करमणूक आणि या धर्तीवरील सगळ्यांनीच आपापल्या कामात थोडा बदल करणे आवश्यक आहे. यामुळे या प्रकारातील वाढत्या गरजेनुसार सेवा देता येतील, प्रत्येक दिव्यांग व्यक्ती वेगळी असते, आणि त्यांच्या गरजांनुसार हे बदल केले जायला हवेत. अनेक सेवा पुरवठादार पुढे येतील आणि असा अमर्यादित अनुभव देऊ शकतील, अशी आम्ही आशा करतो. यासाठी अनेक गोष्टी करणे अद्याप गरजेचे आहे. यासाठीचा दृष्टीकोन मात्र रचनेवर केंद्रीत असायला हवा, कारण यामुळेच वैयक्तिक स्तरापेक्षा सर्वांना मदत करता येणार आहे. प्रत्येकाने आपल्या दिव्यांग बंधू-भगिनींसाठी सामाजिक स्तरावरील प्रश्नांकडे लक्ष देण्याची गरज आहे, यामुळे आपल्या देशातील प्रत्येक दिव्यांग व्यक्तीला यातून बाहेर पडून, जग बघण्याची संधी प्राप्त होणार आहे.