तिशीत प्रत्येक स्त्रीकडे असायला हवेत हे १० ब्युटी प्रॉडक्स!
आपण सुंदर दिसावे असे प्रत्येक स्त्रीला वाटते.
मुंबई : आपण सुंदर दिसावे असे प्रत्येक स्त्रीला वाटते.
त्यासाठी ती सतत प्रयत्नशील असते. मग ती १६ वर्षांची मुलगी असो किंवा ३० वर्षांची महिला. वयासोबत सौंदर्यातही बदल होऊ लागतात. मात्र आपण विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे त्वचा मुलायम, तजेलदार राहील आणि तुम्ही सदैव तरूण दिसाल. जर तुमचे वय ३० वर्ष असेल तर तुमच्याकडे या १० ब्युटी प्रॉडक्स असणे, गरजेचे आहे.
बॉ़डी स्क्रब : आठवण्यातून एकदा स्क्रबचा वापर जरूर करा. त्यामुळे डेड स्किन निघून जाईल आणि त्वचा चमकदार होईल.
बॉडी बटर : त्यामुळे त्वचेला चांगली मॉईश्चराईज होईल.
आय क्रिम : या वयात डोळ्याखाली काळी वर्तुळे येतात. त्यासाठी आय क्रिम वापरा.
नाईट क्रिम : यामुळे त्वचा टवटवीत राहण्यास मदत होते. याचा नियमित वापर करा.
मेकअप रिमुव्हर : मेकअप काढताना साबणाचा वापर करणे टाळा. त्यामुळे त्वचेचे नुकसान होऊ शकते. मेकअप काढण्यासाठी चांगल्या मेकअप रिमुव्हरचा वापर करा.
सनस्क्रिन : यामुळे सुर्याच्या किरणांपासून त्वचेचे संरक्षण होते. आणि डार्क स्पॉट, सुरकुत्या यापासून त्वचा सुरक्षित राहते.
हेअर मास्क : केस सुंदर, मजबूत होण्यासाठी आठवड्यातून एकदा हेअर मास्क लावा.
कन्सीलर : हे एक चांगले ब्युटी प्रॉडक्ट आहे. यामुळे डार्क स्पॉट, पिगमेंटेशन झाकण्यास मदत होते.
प्रायमर : स्वतः जवळ एक चांगले प्रायमर ठेवावे. त्यामुळे त्वचा मुलायम राहते आणि गरम वातावरणात देखील त्वचा चांगली राहते.
लिपस्टिक : नॅचरल ऑईल व बटर असलेली लिपस्टिक वापरा. त्यामुळे ओठ हेल्दी व मुलायम राहतील.