Best Yoga For Spine in Marathi: आपल्या सर्वांनाच पाठदुखीचा त्रास असतो. अशावेळी आपण वेगवेगळे आपण योगासनांचा फायदा घेऊ शकतो. त्यामुळे तुम्हाला जर का पाठदुखीचा त्रास असेल तर घरच्या घरी तुम्ही आसनं, योगासनं करू शकता. ज्याच्या तुमच्या पाठदुखीवर चांगला फायदा होऊ शकतो. आजकाल सर्वत्र कामाचं प्रेशर पुष्कळ आहे. त्यामुळे महिला, पुरूष या सर्वांनाच पाठदुखीचा फायदा होताना दिसतो. कामाच्या नियमित वेळा, एक्सट्रा काम, सतत लॅपटॉपसमोर बसणं. यामुळे शरीराची आणि खासकरून पाठदुखीची हानी होताना दिसते आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या शरीराची योग्य ती काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे असते. अशावेळी आपल्याला जीममध्ये जायलाही वेळ मिळत नाही. त्यातून सतत दगदग होत असल्यामुळे आरामालाही वेळ मिळत नाही परंतु रोज तुम्ही योगासनांसाठी वेळ काढलाच तर तुम्हाला त्याचा चांगला फायदा होईल. तेव्हा या लेखातून आपण जाणून घेऊया की तुम्ही घरबसल्या कोणती आसनं करू शकता. 


  • COMMERCIAL BREAK
    SCROLL TO CONTINUE READING

    Locust Pose लोकस्ट पोझ - तुम्हाला पाठदुखीचा त्रास असेल तर तुम्ही हे आसन करू शकता. पोटावर झोपा आणि मग आपलं शरीर स्ट्रेच करा. मग पाय आणि हात मागून एकत्र वर घ्या आणि स्ट्रेज करा. 

  • Cat-Cow Pose कॅट काऊ पोझ - ही पोझ तुमच्यासाठी फार सोप्पी आहे. मांजर ज्याप्रमाणे उभी राहते त्याप्रमाणे तुम्ही पोझ द्या आणि मान वर करून बॉडी स्ट्रेज करा. 

  • Adho Mukha Svanasana अधोमुख शवासना - तुम्हाला जर का पाठदुखीचा त्रास असेल तर तुम्ही हा हे आसन करू शकता. अधोमुख श्वानासनचा तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. आपल्या पायावर उभे राहा आणि मग खाली वाका त्यानंतर दोन्ही हात जमिनीवर ठेवून बॉडी स्ट्रेच करा. 

  • Fish Pose फीश पोझ - आपल्याला पाठदुखी थांबवायची असेल की ही पोझ तुम्ही करू शकता. आपल्या पाठीवर झोपा आणि मग पाठ वर करा त्यानंतर आपले दोन्ही हात हे कंबरेजवळ ठेवा आणि आपली मान ही खाली ठेवा व आपली बॉडी स्ट्रेच करा. 

  • Paschimottanasana पश्चिमोत्तासना - हे आसन सर्वात लोकप्रिय आसनं आहे ज्याचा तुम्हाला चांगलाच फायदा होऊ शकतो. आपले पाय समोर ठेवा आणि तळापायावर डोकं ठेवून बॉडी हलकीशी स्ट्रेज करा. 

  • Balasana बालसना -  पश्चिमोत्तासनाप्रमाणे बालासनाही एक चांगले आसन आहे. यामध्ये फक्त पायाची मांडी घालायची आहे आणि केवळ डोकं खाली ठेवायचे आहे आणि हात समोर ठेवून स्ट्रेच करा. 

  • Bhujangasana भुजंगसना - सुर्यनमस्कारातील एक सारखाच प्रकार हा देखील आहे. भुंजगासनात तुम्ही पोटावर झोपा आणि मग पाय जमीनीवर ठेवून शरीर स्ट्रेज करा आणि मान वर करा. 

  • Setu Bandhan Asana सेतू बंधन आसना - यावेळी तुम्ही पाठीवर झोपा. हात जमिनीवर ठेवा आणि कंबरेसह पाय वर घ्या आणि स्ट्रेच करा. 

  • Trikonasana - त्रिकोणासनात आपल्या एका पायाला हात लावा आणि दूसरा पाय स्ट्रेच करू त्याच बाजूवरील हात वर स्ट्रेच करा. 


(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. ZEE 24 TAAS त्याची पुष्टी करत नाही.)