मुंबई : काजू कोकणात आवर्जून मिळणारं खास फळ. आंबा, फणसासोबतच काजू देखील आवडीने खाल्ला जातो. काजू खाल्यामुळे अनेक आजार दूर राहतात. त्यामुळे काजू दररोजच्या आहारात असणे आवश्यक आहे. काजूला ड्रायफ्रुट्सचा राजा मानले जाते. शरीरासाठी काजू खूप गुणकारी आहेत. काजूचे निअयमित सेवन केल्यास विविध फायदे दिसून येतील. थोडेसे काजू खाल्ल्याने शरीराला केवळ उर्जाच मिळत नाही तर विविध आजार आपल्यापासून दूर राहतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

1) काजूमध्ये प्रोटीन, व्हिटॅमिन बी, सी,के चे प्रमाण अधिक असते. तसेच काजूत पोटॅशिअम, मॅग्नेशिअमचं प्रमाण देखील सर्वाधिक असते. काजू खाल्यामुळे एनर्जी वाढते आणि अनेक आजारांपासून आपलं संरक्षण होतं. 


2) काजूमुळे मेंदूच कार्य अधिक चांगल होतं. त्यामुळे ब्रेन अधिक स्मार्ट करण्यासाठी काजू खाल्लेले अधिक फायदेशीर असतात. काजू खाल्याने लहान मुलांमध्ये मेंदूची चांगली वाढ होते आणि ग्रास्पिंग पावर देखील वाढते. त्यामुळे लहान मुलांना काजू आवर्जून खायला द्यावेत. 


3) काजू खाल्याने स्मरणशक्ती आणि एकाग्रता वाढते. तसेच काजूत असणाऱ्या एनर्जीमुळे मायग्रेन, डोकेदुखीचा त्रास होत असल्यास तो 100 टक्के कमी होतो आणि कालांतराने कमी होतो. 


4) डोकेदुखी किंवा मायग्रेनचा त्रास असल्यास रोज सकाळी उपाशी पोटी 4 काजू खावेत आणि त्यावर एक चमचा मध घ्यावं. यामुळे मायग्रेनचा त्रास कमी होतो. 



5) नैराश्य आणि डिप्रेशनवर देखील काजू रामबाण उपाय आहे. मासिक पाळीच्या दिवसांत होणाऱ्या मुडस्विंग्सच्या वेळी देखील काजू खाल्याने चांगला फायदा होतो. काजूत आर्यन आणि ओमेगा 3 चे प्रमाण अधिक असल्यामुळे मूड चांगला ठेवण्यात काजू अधिक फायदेशीर आहे. 


6) काजूमुळे मेंदूतील सिरोटोनिनचं प्रमाण वाढतं, मानसिक स्थिती देखील सुधारते. त्यामुळे मानस्कि स्थैर्य खचलेल्या व्यक्तीाल आवर्जून काजू खायला दिले जातात. 


7) काजूत हेल्थी फॅट्सच प्रमाण अधिक आहे. त्यामुळे डायबिटीस, रक्तदाब, लठ्ठपणा यावर काजू फायदेशीर ठरतात. यात प्रोटीन आणि विटामिनचं प्रमाण देखील जास्त आहे. तसेच काजू खाल्याने रक्ताभिसरण सुरळीत होते आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते. 


8) काजू डायबिटीस आणि डायबिटीसपासून जडणाऱ्या आजारांपासून दूर राहण्यास मदत करते. 


9) काजूतील पोषकतत्वांमुळे पेशीच्या डीएनएचं रक्षण होतं. यामुळे अनेक पेशी निरोगी राहतात. त्यामुळे अधिक आजारांपासून मुक्तता मिळते. 



10) काजूचं सेवन केल्यामुळे कॅन्सरच्या पेशी शरीरात पसरत नाहीत. त्यामुळे लिव्हर कॅन्सर आणि ब्रेस्ट कॅन्सर सारखे आजार आपल्यापासून दूर राहतात. 


11) अशक्तपणा आला असेल किंवा काहीही काम केल्यास थकल्यासारखं वाटत असेल तर दररोज आपल्याजवळ काजू ठेवावेत.


12) काजू शारीरिक आणि मामसिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात.