मुंबई : गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाखा भलताच वाढला आहे. उन्हाच्या सतत वाढत्या पाऱ्यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या उद्भवत आहेत. त्यापैकी एक म्हणजे अंगावर घामोळ्या येणे. घाम आणि उष्णतेमुळे मान, पोट आणि पाठीवर बारीक पुरळ होतात आणि त्यावर खाज येते. तुमची ही समस्या दूर करण्यासाठी १५ घरगुती उपाय करून पाहा. हे सोपे उपाय नक्कीच तुमची समस्या दूर करू शकतात.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

- कोथिंबीर बर्फ घातलेल्या पाण्यात भिजवून ठेवा. ५ तासांनंतर हे पाणी घामोळ्या झालेल्या भागावर लावा.


- घामोळ्यांवर बर्फ लावल्याने शरीरास गारवा मिळेल.


- मुलतानी मातीचा लेप लावल्याने काही दिवसांतच घामोळ्यांची समस्या दूर होईल.


- लिंबाचे साल घामोळ्यांवर घसल्याने घामोळ्या दूर होण्यास मदत होते. आंघोळीच्या पाण्यात लिंबाचा पाला टाका आणि पाणी गरम करून आंघोळ करा.


- खोबऱ्याचे तेल आणि कापूर घामोळ्यांवर अत्यंत गुणकारी आहे. खोबऱ्याच्या तेलात कापूर एकत्र करून अंघोळ केल्यानंतर शरिरावर लावा.


- चंदन गुलाबजलवर घासून कापूरमध्ये मिसळून लावल्याने घामळ्यांपासून आराम मिळतो. 


- बारीक केलेली खसखस पाण्यात चांगल्या प्रकारे एकत्रित करा, त्यानंतर शरिरावर लावा. 
खसखसचे शरबतही घामोळ्यावर गुणकारी आहे. 


- मोहरीचे तेल पाण्यात एकत्रित करून लावल्याने घामोळ्यांची समस्या काही दिवसात दूर होते.


- संत्रींच्या सालींची पावडर गुलाबजलमध्ये एकत्रित करून लावल्याने घामोळ्यांवर लवकर आराम मिळतो. 


- तुळशीची काडी पाण्यात घासून घामोळ्यांवर लावल्याने घामोळ्या दूर होतात.


- कारल्याचे रस सुद्धा घामोळ्यांवर अत्यंत गुणकारी आहेत. कारल्याच्या रसामध्ये १ चमचा खाता सोडा एकत्रित करून दिवसातून ३ वेळा घामोळ्यांवर लावा. 


- कच्चा अंबा मंद आचेवर भाजून त्यातील गर काढून घ्या. गर गार झाल्यानंतर तो घामोळ्यांवर लावा.


- लिंबूच्या रसामध्ये कोथिंबीर घालून रस तयार करा, हे रस प्यायल्याने घामोळ्या दूर होतात.


- लसणाच्या पाकळ्या बारीक करून त्यांचा रस तीन दिवस घामोळ्यांवर लावल्याने आराम मिळेल.


- ऐलोवेरा जेल घामोळ्यांवर लावल्याने शरिरात गारवा निर्माण होतो. त्यामूळे घामोळ्या लवकर दूर होतात.