एका टी बॅगमध्ये टॉयलेट सीटपेक्षा १७ पट जास्त जिवाणू
ही बातमी वाचून चहा प्रेमींची कदाचित झोप उडणार आहे. हे वास्तव पचविण्यास कदाचित त्यांना जड जाईल. यापूढे त्यांना चहा कडू लागण्याचीही शक्यता आहे.
मुंबई : चहा हा अनेकांचा विकपॉईंट असतो. दिवसाची सुरूवात अनेकजण चहा पिऊन करतात. तर अनेकांना उठताबसता चहाचा घोट लागतो.
पण ही बातमी वाचून चहा प्रेमींची कदाचित झोप उडणार आहे. हे वास्तव पचविण्यास कदाचित त्यांना जड जाईल. यापूढे त्यांना चहा कडू लागण्याचीही शक्यता आहे.
अहवाल
टी बॅग चहामध्ये टॉयलेट सीटपेक्षा १७ पट जास्त जिवाणू असल्याचा निष्कर्ष निघाला आहे. ‘इनिशल वॉशरूम हाइजीन’ या ब्रिटिश संस्थेने या संबंधीचा अहवाल दिला आहे.
'कर्मचारी अस्वच्छ'
ऑफिसमधील चहा देणारे कर्मचारी अस्वच्छ राहत असल्याचा निष्कर्ष लावण्यात आला आहे. चहा-पाणी देताना ते हात स्वच्छ धुवत नसल्याचे समोर आले आहे. त्यामूळे चहा, पाणी देताना जिवाणूं पसरत असल्याचा निष्कर्ष निघाला आहे.
काय म्हणतो अहवाल ?
एका टी बॅगवर ३,७८५ इतके जिवाणू असतात.
एका टॉयलेट साधारण २२० जिवाणू असतात. याची तुलना करता टी बॅगमधील चहामध्ये १७ पट जास्त जिवाणू असतात.
फ्रिजच्या हॅंडलवर
फ्रिजच्या हँडलवर १५९२ एवढे जिवाणू असतात.
किटलीच्या हॅंडलवर
किटलीच्या हँडलवर २४८३ जिवाणू असल्याचे या अहवालात म्हटले आहे.