मुंबई : पुरूष आणि महिला या दोघांनाही ब्लॅकहेड्सची समस्या सतावते. केसांचे रोम छिद्र बंद झाल्याने ब्लॅकहेड्स येतात. आणि सध्या अनेकजण या ब्लॅकहेडसच्या समस्येने त्रस्त आहेत. जर तुम्हालाही ब्लॅकहेडसच्या समस्येला सामोरं जावं लागतं असेल तर आता तुम्ही घरच्या घरी या समस्येचं निराकरण करू शकता. ब्लॅकहेड्स फ्री स्किनसाठी सॅलिसिलीक अॅसिड बेस क्लींजरचा वापर करणं फायदेशीर ठरतं.


ब्लॅकहेड्स काढण्यासाठीचे घरगुती उपचार


अक्रोडचा स्क्रब


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अक्रोडचा स्क्रब तयार करण्यासाठी 2 अक्रोड, एक छोटा चमचा दही आणि एक चमचा मधाची गरज आहे.


कसा तयार कराल स्क्रब?


अक्रोडचा क्रश करून त्याची पावडर तयार कराल. 
अक्रोडच्या तयार केलेल्या पावडरमध्ये दही आणि मध मिक्स करून त्याचा मास्क बनवा.
हा तयार केलेला मास्क हळूहळू चेहऱ्यावर लावा. 10 मिनिटं हा मास्क चेहऱ्यावर राहूद्या


क्ले मास्क


क्ले मास्क रोमछिद्रांमधील मळ, तेल तसंच अशुद्ध घटक शोषून घेतात. ज्यामुळे ब्लॅकहेड्स निघून जाण्यासही मदत मिळते. क्ले मास्क तयार करण्यासाठी एक चमचा चंदनाची पावडर आणि गुलाब पाण्याची गरजेचं आहे.


क्ले मास्क कसं तयार करावं?


1. चंदनाची पावडर आणि गुलाब पाणी एकत्र करून एक चिकट पेस्ट तयार करावी. 
2. ही पेस्ट चेहऱ्यावर 15 मिनिटं लावून ठेवावी
3. यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवून घ्या. तसंच मॉइस्चराइजरने स्किनकेयर रूटीन पूर्ण करा.
4. हे मास्क आठवड्यातून 2 वेळा लावावं.