मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसात सतत काहीतरी थंड खाण्याची इच्छा असते. पण चहाची सवय काही केल्या जात नाही. बहुतांश लोक त्यांच्या दिवसाची सुरूवात दूधाच्या चहाने करतात. पण उन्हाळ्याच्या दिवसात दूधाचा चहा आरोग्यास घातक असतो. हर्बल चहा आरोग्यास अत्यंत लाभदायक असते. हर्बर चहामध्ये अँटीऑक्सीडेंट्सचे प्रमाण मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे कर्करोग, मधुमेह, उच्च रक्तदाब यांसारखी आजार दूर होण्याची शक्यता असते.    


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पुदीन्याची चहा 
पुदीन्याचे सेवन पोटासाठी फार उपयुक्त आहे. जगातील ज्या हर्ब्समध्ये सर्वात जास्त अँटीऑक्सीडंट्स असतात, पुदीना त्यापैकी एक आहे. पुदीन्यामध्ये विटामिन ए, मॅग्नीशियम, फॉलेट आणि आयरन भरपूर असतात. उकळत्या पाण्यामध्ये २ ते ३ चमचे पुदीन्याची पाने घाला. १५ मिनिटे ते उकळण्यासाठी ठेवा. त्यांनंतर ते मिश्रण गाळून प्या. गोड हवे असल्यास चहामध्ये एक चमच मध घाला.  


तुळसीची चहा
तुलसीमध्ये आयुर्वेदिक गुणधर्म असतात. तुळसीमध्ये सुद्धा एंटीऑक्सीडेंट्स भरपूर प्रमाणात आसते. तुळसी ची चहा बनवण्यासाठी एक पॅन मध्ये एक कप पाणी घ्या आणि ते चांगले उकळेपर्यंत गरम करा. उबळ आल्यावर पॅनचे आचे काढून त्यात ६-७ तुलसीची पाने व्यवस्थित धुऊन घाला. 2 मिनिटे झाकून ठेवून नंतर चहा गाळून प्या. त्यामध्ये अर्ध्या लिंबाचे रस आणि एक चमच मध घाला. हा चहा आपल्या पोट, डोळे, यकृत, लिव्हर आणि हृदयसाठी खूप फायदेशीर आहे. दिवसातून २ वेळा चहाचे नियमित सेवन केल्याने तुम्ही वजनही कमी करू शकता.


गुलाबाच्या फुलाची चहाची
गुलाबाच्या फुलांमध्ये अनेक प्रकारचे गुण असतात. गुलाबाच्या चहामुळे रोग प्रतिकारक क्षमता वाढते. गुलाबाची चहा प्यायल्याने त्वचेवर चमक वाढते. गुलाबमध्ये विटामिन ए, व्हिटॅमिन बी 3, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन डी आणि विटामिन ई यांसारखे गुणधर्म असतात. गुलाबाची पाने शरीराची चरबी कमी करण्यात मदत करतात. 


गुलाब की चहा बनवण्यासाठी दीड कप पाणी घ्या आणि त्यात एक ताज्या गुलाबची पाने घाला. आता १ मिनिटांपर्यंत जलद आचेवर उकळत ठेवा नंतर ३ मिनिटे चहा झाकून ठेवा. त्यानंतर चहा गाळून प्या.