मुंबई : आरोग्याच्या विविध समस्यांवर आपण अनेक उपचार करतो. डॉक्टरांकडे जातो, घरगुती उपाय करतो. अनेकदा आपल्याला फळे-भाज्या खाण्याचा सल्ला दिला जातो. भाज्या-फळांचे ज्यूस देखील पौष्टीक असतात. दुधीची भाजी फारशी कोणाला आवडत नाही. मात्र त्यातील व्हिटॉमिन्स आणि मिनीरल्स आरोग्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. दुधीचा एक चमचा ज्यूस देखील फायदेशीर आहे. जाणून घेऊया त्याचे फायदे...


चेहरा तजेलदार होण्यासाठी...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एक चमचा दुधीचा रस त्यात बेसन, दही आणि काकडीची पेस्ट घालून चांगले मिश्रण तयार करा. चेहऱ्यावर लावा आणि 20 मिनिटांनी पाण्याने धुवा. त्याचबरोबर दुधीचा रस रोज घेतल्याने चेहऱ्यावरील काळे डाग, पिंपल्स दूर होऊन चेहरा तजेलदार होतात.


सर्दी-खोकल्यावर गुणकारी


दुधीचा एक चमचा रसात मध घालून प्या. यामुळे सर्दी-खोकल्याची समस्या दूर होते.


केसांच्या वाढीसाठी...


एक चमचा दुधीच्या रसात 2 चमचे आवळा पावडर घालून मिक्स करा आणि केसांना लावा. 20 मिनिटांनी केस धुवा. असे आठवड्यातून 2-3 वेळा केल्याने केसांची वाढ चांगली होते.


बद्धकोष्ठतेवर फायदेशीर...


दुधीच्या एक चमचा रसात मध घालून नियमित प्यायल्यास पचनक्रिया सुधारते. त्यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते.