नवी दिल्ली : आपल्या बदलेल्या जीवनशैलीमुळे पोटाच्या अनेक समस्या उद्भवतात. पोट सुटणे, गॅसेस, अपचन या समस्यांनी आपल्यापैकी अनेकजण ग्रासले आहेत. पण काही योगासनांच्या मदतीने या समस्या दूर होण्यास नक्कीच मदत होईल. मात्र त्यात सात्यत असणे गरजेचे आहे. पाहुया कोणती आहेत ती आसने...


बालासन


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पोटावर अतिरिक्त चरबी असल्यास, पोट गॅसमुळे फुगल्यासारखे वाटत असल्यास बालासन करणे फायदेशीर ठरेल. बालासनामुळे पोटावरील चरबी कमी होण्यास मदत होण्यास मदत होते. गॅसेसपासून मुक्ती मिळेत. तसंच पाठ, खांद्यावरील तणावही दूर होतो.


धनुरासन


यात शरीराचा आकार धनुष्काप्रमाणे होतो, त्यामुळे यास धनुरासन असे नाव आहे. यामुळे सुटलेले पोट कमी होण्यास मदत होते. हे आसन नियमित केल्यास पोट, छाती, जांघेचे स्नायू मजबूत होतात. त्याचबरोबर रक्तप्रवाह सुधारतो.


मत्स्यासन


आसनाच्या अंतिम स्थितीत शरीराचा आकृतीबंध माशाप्रमाणे होत असल्याने याला मत्स्यासन असे म्हणतात. या आसनामुळे थकवा दूर होतो. गॅसची समस्या दूर होते. पचन सुधारते.


हलासन


पोट पातळ राहण्यास या आसनाची मदत होते. पायांचे स्नायू मजबूत होतात. हाडांना बळकटी येते. हलासन नियमित केल्यास पचनक्रिया सुधारते. आळस दूर होवून दिवसभर ताजेतवाने वाटते.