हे आहेत हळदीचे दूध पिण्याचे `५` फायदे!
हळद बहुगुणी आहे. त्याचे अनेक स्वास्थवर्धक आणि सौंदर्यवर्धक फायदे आहेत.
नवी दिल्ली : हळद बहुगुणी आहे. त्याचे अनेक स्वास्थवर्धक आणि सौंदर्यवर्धक फायदे आहेत. त्याचबरोबर जखम झाल्यास आपण लगेच त्यावर हळद लावतो. कारण त्यात अंटीसेप्टिक आणि अंटीबायोटीक गुणधर्म असतात. दूध तर पूर्णान्न आहे. त्यामुळे दूधात हळद घालून घेतल्यास आरोग्यास नक्कीच फायदा होईल. जाणून घेऊया हळदीचे दूध पिण्याचे फायदे...
ब्लड शुगर नियंत्रित राहील
रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यास मधुमेह होऊ शकतो, हे आपण सगळेच जाणतो. रक्तात सारखरेचे प्रमाण वाढल्यास हळद घालून दूध घेणे फायदेशीर ठरते. ब्लड शुगर नियंत्रित राहण्यास मदत होते.
दुखण्यावर गुणकारी
जखम झाल्यास त्यावर आपण हळद लावतो. त्याचप्रमाणे हळदीचे दूध प्यायल्यास जखम लवकर भरण्यास मदत होते. त्याचबरोबर कानदुखी किंवा इतर समस्यांवर आराम मिळतो. रक्तप्रवाह सुधारतो.
सुडौल शरीरयष्टी
सुडौल शरीरयष्टी हे सर्वांचेच स्वप्न असते. हळदीच्या सेवनाने शरीर सुडौल होते. रोज एक ग्लास दुधात अर्धा चमचा हळद घालून घेतल्यास शरीर सुडौल होण्यास मदत होते. कारण त्यामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट्स हळूहळू कमी होऊ लागते. त्यात असलेल्या कॅल्शियम आणि अन्य पोषक तत्त्वांमुळे वजन कमी होण्यास मदत होते.
त्वचा सुंदर होण्यासाठी
दूध प्यायल्याने त्वचेला नैसर्गिक तजेला प्राप्त होतो. दूधात हळद घालून घेतल्यास इंफेक्शन, खाज, पिंपल्स यांसारख्या त्वचेच्या समस्येपासून सुटका होते. त्वचा आतून स्वच्छ होऊन हेल्दी व चमकदार होते. त्याचबरोबर हळद आणि बेसन यांचा फेसपॅकही त्वचेसाठी उपयुक्त ठरतो.
निद्रानाशावर फायदेशीर
तुम्हाला रात्री झोप लागत नाही का? तुम्ही रात्रभर विचार करत राहता का? मग हळदीचे दूध घेणे नक्कीच फायदेशीर ठरेल. रात्री जेवणानंतर अर्ध्या तासाने हळद घालून दूध प्या आणि फरक बघा.