आयुर्वेदानुसार पाणी पिण्याचे काय नियम आहेत? शरीरासाठी काय चांगल?
How To Drink Water : शरीराला पाण्याची नितांत आवश्यकता आहे. पण पाणी पिताना काही नियम पाळले तर हेच पाणी आपल्यासाठी अमृतासमान असेल, जाणून घ्या नियम
Ayurvedic Rules To Drinks Water : भारतात आयुर्वेदाची खूप मोठी परंपरा आहे. आयुर्वेद हे शास्त्र आहे. याचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा आहे. जीवनात दैनंदिन बाबींमध्ये आयुर्वेदानुसार काही गोष्टींचे पालन केल्यास शरीरासाठी हितकारक होते. मानवी शरीरात जवळास ६० ते ७० टक्के पाणी आहे. या पाण्याचं महत्त्व भरपूर आहे. आपण दिवसभरात जे पाणी पितो त्याला देखील खूप महत्त्व आहे.
आयुर्वेदात अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. जसे की, पाणी कसे प्यावे. किंवा कोणत्यावेळी किती प्रमाणात प्यायलेलं पाणी तुम्हाला अमृतासमान आणि विषासमान आहे, ते देखील सांगितलं आहे. Vedicvarsa या इंस्टाग्राम अकाऊंटवर आयुर्वेदिक डॉ. मृणालिनी जोशी यांनी याबाबत माहिती शेअर केली आहे.
एक सुशाभित श्लोक आहे की, अजीर्णे भेषजं वारि, जीर्णे वारि बलप्रदम्|भोजने चामृतं वारि, भोजनान्ते विषप्रदम्|| यानुसार, जर पाणी प्यायलात तर नक्कीच शरीराला फायदा होईल.
अर्जीण झालं तर कोमट पाणी - अजीर्णे भेषजं वारी .. असं श्लोकात म्हटलंय. अर्जीण झालं तर कोमट पाणी. अनेकदा चुकीच्या जीवनशैलीमुळे किंवा आहारात थोडा बदल झाला तर अजीर्ण होतं. यावेळी कोमट पाणी हे औषधासमान काम करते. कोमट पाणी योग्य प्रमाणात प्यायल्यास तुम्हाला
जेवणानंतर दीड तासानंतर - जेवणानंतर दीड तासानंतर पाणी प्यायल्यास ते तुम्हाला बल म्हणजे ताकद देऊन जाईल. अन्नपचन करण्यासाठी तुम्हाला पाण्याची गरज असते. अशावेळी जेवणानंतर दीड ते दोन तासांनी पाणी प्यायल्यास ते तुम्हाला फायदेशीर ठरेल.
जेवायला बसल्यावर पाणी पिणे - जेवताना किंवा जेवायला बसल्यावर आहारासोबत पाणी पिणे हे अमृतासारखे आहे. कारण अन्न, आहार पुढे ढकलायला पाण्याची गरज असते. अशावेळी जेवताना थोडे पाणी प्यायल्यावर ते अमृतासारखे असेल.
भोजनाच्या शेवटी विषाप्रमाणे - जेवणानंतर पाणी प्यायल्यास ते शरीरात अगदी विषासमान काम करते. त्यामुळे जेवणानंतर कधीच पाणी पिऊ नये. एकतर ते जेवताना प्यावे किंवा जेवल्यानंतर दीड ते दोन तासांनी प्यायवे. आहारासोबतच आयुर्वेदात पाण्याचे खूप महत्त्व आहे.
पाणी कसे प्यावे
आयुर्वेदात पाणी कसे प्यावे हे देखील सांगितलं आहे. सर्वात प्रथम पाणी कधीच उभ्याने पिऊ नये.
पाणी सावकास ग्लासाला अथवा पाणी पिताना तोंड लावून पाणी प्यावे
जसं चुळ भरताना पाणी फिरवतो तसंच पाणी पिताना तोंडात फिरवून ते प्यावे
पाणी कधीच घटाघटा पिऊ नये.
(Disclaimer -वरील माहिती सामान्य संदर्भांवरून घेण्यात आली आहे. 'झी २४ तास' याची खातरजमा करत नाही.)